मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. चौथ्या यादीत पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पुण्यातील कसबा पेठ, चिखली, कोल्हापूर उत्तर, केज आणि कलिना विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
मनसेच्या पाच उमेदवारांची नावं :
गणेश भोकरे - कसबा पेठ
गणेश बरबडे - चिखली
अभिजित राऊत - कोल्हापूर उत्तर
रमेश गालफाडे - केज
संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी - कलिना
![mns candidate list](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/25-10-2024/22762615_mns-candidate-list.jpg)
मनसेच्या चार यादी जाहीर : कसबा पेठ मतदारसंघातून गणेश भोकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिखली मतदारसंघातून गणेश बरबडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी मनसेनं तीन याद्या जाहीर केल्या होत्या. मनसेनं आतापर्यंत एकूण 63 उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेनं जोरदार तयारी सुरू केली. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं अनेकांचं लक्ष हे माहिम मतदारसंघाकडं लागलंय.
मनसेच्या यादीत कोणाला संधी?
कल्याण ग्रामीण - राजू पाटील
माहिम - अमित राज ठाकरे
भांडूप पश्चिम - शिरीष सावंत
वरळी - संदीप देशपांडे
ठाणे शहर - अविनाश जाधव
मुरबाड - संगीता चेंदवणकर
कोथरुड - किशोर शिंदे
हडपसर - साईनाथ बाबर
खडकवासला - मयुरेश रमेश वांजळे
मागाठाणे -नयन कदम
बोरीवली - कुणाल माईणकर
दहिसर - राजेश येरुणकर
दिंडोशी - भास्कर परब
वर्सोवा - संदेश देसाई
कांदिवली पूर्व - महेश फरकासे
गोरेगाव - विरेंद्र जाधव
चारकोप - दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
विक्रोळी - विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
चेंबूर - माऊली थोरवे
चांदिवली - महेंद्र भानुशाली
मानखुर्द शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
ऐरोली - निलेश बाणखेले
बेलापूर - गजानन काळे
मुंब्रा कळवा - सुशांत सूर्यराव
नालासोपारा - विनोद मोरे
भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
मीरा भाईंदर - संदीप राणे
शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
गुहागर - प्रमोद गांधी
कर्जत जामखेड - रविंद्र कोठारी
आष्टी - कैलास दरेकर
गेवराई - मयुरी बाळासाहेब म्हस्के
औसा - शिवकुमार नागराळे
जळगाव शहर - अनुज पाटील
वरोरा - प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण - महादेव कोनगुरे
कागल - रोहन निर्मळ
तासगाव कवठे महांकाळ - वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा - संजय शेळके
हिंगणा - विजयराम किनकर
नागपूर दक्षिण - आदित्य दुरुगकर
सोलापूर शहर उत्तर - परशुराम इंगळे
हेही वाचा -