ETV Bharat / politics

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार? दिल्ली दरबारी होणार अंतिम बैठक

पक्षांतर्गत नाराजीनाट्यामुळं महायुतीचं जागावाटप रखडलं आहे. मात्र, यावर आज (24 ऑक्टोबर) दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Seat Sharing Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting with Amit Shah in Delhi
महायुती (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

मुंबई : महायुतीनं जागावाटपात आघाडी घेतली असली तरी सुद्धा अद्याप काही जागांचा तिढा कायम आहे. यासाठी आज (24 ऑक्टोबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारीच (23 ऑक्टोबर) दिल्लीत दाखल झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत पोहोचतील. या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सोडवला जाणार असून महायुतीची जागावाटपा संदर्भातील ही अंतिम बैठक असल्याचं सांगितलं जातय.

उर्वरित जागांचा तिढा आज सुटणार : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना महायुतीत काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. या अगोदर भाजपानं 99, शिवसेना एकनाथ शिंदे गटानं 45, तर अजित पवार गटानं 38 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. एकूण 288 जागांपैकी आतापर्यंत महायुतीकडून 182 जागांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित 106 जागांपैकी जवळपास बहुतांश जागांवर एकमत झालं असून काही जागांवर मतभेद आहेत. यापैकी अनेक जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केलाय. त्यामुळं हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. अमित शाह यांनी यापूर्वीच तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपापसात जितक्या जागांचा प्रश्न सोडवता येईल त्या त्यांनी सोडवाव्यात त्यानंतर उरलेल्या जागा संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी असं सांगून ठेवलं होतं. त्या अनुषंगानं आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे हे बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरहून रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. परंतु, मुख्यमंत्री शिंदे काल दिल्लीत पोहोचू शकले नाहीत. मुख्यमंत्री काल गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तिथून ते गोव्याला गेले आणि गोव्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित झाले. त्यामुळं ते आज दिल्लीकडं रवाना होणार आहेत.

हेही वाचा -

  1. शिवसेनेची पहिली यादी जाहीर: अमित ठाकरे vs सदा सरवणकर लढत, जाणून कोणत्या मतदार संघातून कोण मैदानात
  2. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर
  3. शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राधानगरी, करवीरमध्ये उमेदवार, मात्र उत्तरचा सस्पेन्स कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.