ETV Bharat / politics

शिवसेना-भाजपामधील अंतर्गत वाद संपुष्टात; नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक एकत्र

प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यातील वाद हा नवीन नसून जगजाहीर आहे. मात्र, आमच्यात कोणताही वाद नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक यांची संयुक्त पत्रकार परिषद (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

ठाणे : मिरा - भाईंदर शहरात शिवसेना आणि भाजपामधील अंतर्गत वाद संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे. सोमवारी आजी-माजी आमदार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. मिरा - भाईंदर विधानसभा मदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आमच्यात कोणताही वाद नसल्याचं मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद हा नवीन नसून जगजाहीर आहे. प्रताप सरनाईक सलग चार वेळा शिवसेनेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाही त्यांना महायुतीकडून शिवसेनेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मिरा - भाईंदर मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून नरेंद्र मेहता यांना संधी मिळाली आहे. 2019 मध्ये मेहता यांना शिवसेनेकडून मदत न मिळाल्यानं हार पत्करावी लागली. त्यामुळं यंदा मेहता यांना शिवसेना मदत करत महायुतीच्या धर्माचं पालन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चुका विसरुन एकत्रित काम करणार : 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांनी नरेंद्र मेहता हे महायुतीचे उमेदवार असताना अपक्ष उमेदवार विद्यमान आमदार गीता जैन यांना मदत केली. सध्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी खुलेआम अपक्ष उमेदवार गीता जैन यांना मदत केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचं पालन झालं नाही, त्यामुळंच नरेंद्र मेहता यांना पराभव पत्करावा लागला. "आम्ही आता महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. मागे झालेल्या चुका विसरुन एकत्रित काम करणार असं, मेहता आणि सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

वरिष्ठांच्या आदेशानंतर संयुक्त पत्रकार परिषद : निवडणुकीत आमदार प्रताप सरनाईक यांच्या समोर तगडं आव्हान नाही, असं बोललं जात आहे. मात्र, नरेंद्र मेहता यांच्यासाठी ही निवडणूक तितकीशी सोप्पी नाही. मेहता यांच्या समोर महविकास आघाडीकडून मुजफ्फर हुसेन तर विद्यमान आमदार गीता जैन अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळं मिरा- भाईंदरची निवडणूक तिरंगी असणार आहे. भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता मागील सहा महिन्यापासून प्रचंड मेहनत घेत आहेत, ते थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांच्याच पक्षातील आणि शिवसेनेतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मदत न केल्यानं मेहता यांचा पराभव झाला. वरिष्ठांच्या आदेशानंतर दोन्ही नेत्यांनी घटक पक्षांना एकत्रित करून संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन्ही मतदार संघ महायुती जिंकणार असल्याची घोषणा केली. यावेळी घटक पक्षातील सर्व स्थानिक नेते उपस्थित होते.

हेही वाचा

  1. नाशिक जिल्ह्यातील 15 जागांसाठी 200 उमेदवार रिंगणात, 137 उमेदवारांची माघार
  2. आंबेडकरी संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा; आव्हाड म्हणाले, "संविधान वाचवण्याचे..."
  3. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट; महायुती महाविकास आघाडीत होणार समोरासमोर लढत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.