ETV Bharat / politics

'झिरो टू हिरो'! 1962 साली शून्य जागा जिंकणारा भाजपा आता आहे 'किंगमेकर'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. राज्यात 20 नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

BJP Maharashtra History
महाराष्ट्र भाजपा पक्षाचा इतिहास (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2024, 8:35 PM IST

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोघांमध्ये प्रामुख्यानं लढत होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील दोन राजकीय भूकंप तर देशासह अवघ्या जगानं पाहिले. यात भाजपाचा हात होता, अशी टीका विरोधक करत आहेत अन् 'आम्ही सत्तेत पुन्हा आलो' हे सांगत बंडामध्ये आमचाच हात असल्याचं भाजपावाले अधोरेखित करत आहेत. याच भाजपाची 1962 ते 2019 पर्यंतची राज्यातील कामगिरी कशी आहे? यावर आज आपण खास नजर टाकणार आहोत.

राज्याची पहिली विधानसभा निवडणूक : महाराष्ट्र राज्याच्या निर्मिनंतर 1962 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत 264 पैकी काँग्रेसनं 215जागा जिंकल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षानं 15, प्रजा समाजवादी पक्षानं 9, भारतीय कम्युनिस्ट पक्षानं 6, रिपब्लिकन पार्टीनं 3 आणि समाजवादी पक्षानं 1 जागा जिंकली होती. या विधानसभेत 15 अपक्ष आमदारही निवडून आले होते. या निवडणुकीत राज्यात भाजपाला म्हणजेच त्यावेळेसच्या जनसंघाला एकही जागा निवडून आणता आली नाही. तेव्हापासून महाराष्ट्रात भाजपाचा प्रवास सुरू झाला.

1962 मध्ये एकही जागा जिंकता आली नाही : महाराष्ट्रात भाजपानं (जनसंघ) 1962 च्या निवडणुकीत 127 उमेदवार रिंगणात उतरवले होते. यात त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. त्यावेळी पक्षाला 5 लाख 48 हजार 97 मतं पडली होती. मात्र, एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. 5 टक्के मतं ही त्यावेळी भाजपाला (जनसंघ) मिळाली होती.

1962 ते 2019 पर्यंतचा प्रवास : भाजपानं (त्यावेळी जनसंघ) 1962 मध्ये 127 जागा लढवल्या व एकही जागा जिंकता आली नाही. 1967 मध्ये 166 जागा लढवल्या व यात त्यांना केवळ 4 जागा जिंकता आल्या. 1972 मध्येही 122 जागा लढवल्या व केवळ 5 जागांवर विजय मिळवला. 1980 मध्ये 145 जागा लढवत 14 जागा जिंकल्या. 1985 मध्ये 67 जागा लढवत 16 जागांवर विजय प्राप्त केला. 1990 मध्ये 104 जागा लढवत 42 जागांवर पक्षानं विजय मिळवला. 1995 मध्ये 116 जागा लढवत 65 जागांवर विजय मिळवला होता. 1999 मध्येही 117 जागा लढवल्या व त्यातील 56 उमेदवार विजयी झाले. त्यानंतर पुन्हा 2004 मध्ये 111 जागा लढवत 54 जागांवर विजय मिळवला. 2009 मध्ये 119 जागा लढवल्या व त्यातील 46 जागा जिंकल्या. 2014 मध्ये 260 जागांवर भाजपानं विधानसभा लढवली. यात त्यांना 122 जागांवर विजय प्राप्त झाला. त्यानंतर 2019 मध्ये भाजपानं 164 जागा लढवल्या. यात त्यांना 105 जागांवर उमेदवार निवडून आणण्यात यश आलं.

भाजपाचा चढता आलेख : राज्यातील विधानसभेत भाजपाचा आलेख हा चढत्या क्रमानं राहिला. 1962 मध्ये 'झिरो'वर असलेले भाजपावाले 2019 मध्ये 'सेंच्युरी' गाठत पुढे सरकले. भाजपाला मिळणाऱया एकूण मतदानामध्येही मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळालं. 1962 मध्ये भाजपाला (त्यावेळी जनसंघ) 5 लाख 48 हजार 97 मतं मिळाली होती, तर 2019 मध्ये 1 कोटी 41 लाख 99 हजार 375 मतं ही भाजपा या एकट्या पक्षाला विधानसभेत मिळाली होती. त्यामुळं भाजपाचा दबदबा हा राज्याच्या राजकारणात असल्याचं दिसून येत आहे.

वरील आकडेवारी ही RKC आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन प्राप्त आहे.

हेही वाचा

  1. विधानसभेचा सारीपाट निवडणूक आयोगानं मांडला, एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल
  2. 5 वर्षांत 2 मोठे बंड; 2019 पासून आतापर्यंत राज्याचं राजकारण किती बदललं?
  3. आचारसंहिता काळात कोणकोणत्या कामांवर बंदी? नियमांचं उल्लंघन केल्यास शिक्षा काय? जाणून घ्या सर्व माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.