ETV Bharat / politics

महायुतीने जागा देऊन सन्मान केला; महादेव जानकर यांची प्रतिक्रिया - Mahadev Jankar

Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आपण महायुती सोबतच आहोत. महायुतीनेही आपण मागितलेल्या दोन जागांपैकी एक जागा देऊन आपला सन्मान केलाय. त्यामुळं आता परभणीची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढवून महायुतीचे हात मजबूत करणार असल्याची प्रतिक्रिया, रासपचे नेते महादेव जानकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

Mahadev Jankar
रासपचे नेते महादेव जानकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 8:29 PM IST

प्रतिक्रिया देताना महादेव जानकर

मुंबई Mahadev Jankar : बारामती मधून सुप्रिया सुळे यांना आपण जोरदार टक्कर दिली होती. काही हजार मतांनी आपला त्यावेळेस पराभव झाला होता. मात्र, आता आपण पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) रिंगणात उतरलो असून महायुतीमधून ही निवडणूक लढवत आहोत, त्यामुळं आपला विजय पक्का आहे. या विजयामुळं आपण महायुतीला अधिक मजबूत करू, अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी व्यक्त केलीय.

महायुतीनं केला सन्मान : आपण महायुतीवर नाराज होता असं विचारलं असता ते म्हणाले की, राजकारणामध्ये चढ-उतार येत असतात. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. मात्र, आपल्याला राजकारणात त्यांना बाजूला ठेवावं लागतं. मी महाविकास आघाडीकडं तीन जागा मागितल्या होत्या. त्यापैकी त्यांनी एक जागा देऊ केली तर मी महायुतीकडं दोन जागा मागितल्या, त्यापैकी त्यांनी एक जागा दिल्यामुळं माझा पन्नास टक्के सन्मान झाला आहे. महायुतीनं मला परभणीची जागा दिली आहे. वास्तविक मी माढा आणि बारामती या दोन जागांवर लक्ष केंद्रित केलं होतं.

सर्व जातीय मतदारांची मते मिळतील : बारामती पट्ट्यात धनगर समाजाचे प्राबल्य होतं. परभणीमध्ये काय परिस्थिती आहे असं विचारलं असता जानकर म्हणाले की, बारामतीमध्ये धनगर समाजाचं प्राबल्य होतं. त्यामुळं आपल्याला त्याचा निश्चित फायदा झाला. परंतु आपण आता सर्वपक्षीय आणि सर्व जातीय उमेदवार आहोत. त्यामुळं मला सर्वच जातींची मते निश्चित मिळतील आणि माझा विजय होईल त्यात शंका नाही.

शेतकरी आणि शिक्षणाच्या प्रश्नावर लढणार : आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या समस्या, शेतमालाला भाव मिळावा, केजीपासून ते पीजीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळावं हा आपला मुख्य मुद्दा राहणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नावरच आपण भर देणार असून त्याच मुद्द्यांच्या आधारे प्रचार करणार असल्याचं जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जिंकण्याचा विश्वास - Amravati Lok Sabha
  2. बारामतीचं ठरलं! नणंद विरुद्ध भावजय लढत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर - Supriya VS Sunetra
  3. "दहावा सर्व्हे केल्यानंतरच ते उमेदवार जाहीर करतील", बारामतीतील सर्व्हेवरुन रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं - Baramati Lok Sabha Constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.