ETV Bharat / politics

काँग्रेसचा अंतर्गत वाद शिगेला; विजय वडेट्टीवारांच्या विरोधातील 'त्या' व्हायरल पत्राबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप - Vijay Wadettiwar viral letter

Vijay Wadettiwar Viral Letter : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या (Vijay Wadettiwar) विरोधातील कथित कुणबी समाजाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरच आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

Lok Sabha Elections Congress officials objected to Vijay Wadettiwar viral letter
विजय वडेट्टीवारां विरोधातील व्हायरल पत्राबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 10:55 PM IST

काँग्रेस पदाधिकारी डॉ. विजय देवतळे

चंद्रपूर Vijay Wadettiwar Viral Letter : चंद्रपूर लोकसभेच्या तिकीटानिमित्तानं काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून येत आहे. सोशल मीडियावर काँग्रेसचे अंतर्गत युद्ध तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय. कॉंग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या विरोधात कथित कुणबी समाजाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कुणबी समाजानं प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी द्या, अशा पद्धतीची मागणी केलेली नाही. मात्र, अशी बदनामीकारक पोस्ट जाणीवपूर्वक व्हायरल केली जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय? : चंद्रपुरमधील कुणबी समाजाच्या वतीनं हे पत्र लिहिण्यात आलं आहे. 'चुकीला माफी नाही' या शिर्षकाखाली हे पत्र व्हायरल होत आहे. त्यात 'वडेट्टीवार हे स्वतः कुणबी जातीच्या मतदानाच्या भरवशावर निवडून येत आहेत. मात्र, चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा हक्क असताना त्यांना विरोध करून आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम वडेट्टीवार करत आहेत. जर वडेट्टीवार यांनी असाच त्रास देण्याचं ठरवलं असेल तर कुणबी समाज हे कदापि सहन करणार नाही आणि येत्या निवडणूकीत आपली जागा दाखवेल', असं लिहिण्यात आलंय.

कुणबी समाजाला गृहीत धरू नये : या पत्रावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला आहे. वास्तविक जिल्ह्यात समाजाची कुणबी समाज संघटना म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा आहे. ही व्यवस्था जिल्ह्यातील कानाकोप‌‌ऱ्यात पोहोचलेली आहे, कुणबी समाज संघटनेला जर प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी मिळावी, असं वाटलं असतं तर कुणबी समाज संघटनेनं यादृष्टीनं काँग्रेस पक्षाकडं अधिकृत पत्रव्यवहार केला असता. मात्र, समस्त कुणबी समाजाच्या नावावर असे पत्र तयार करत ते व्हायरल केले नसते. समस्त कुणबी समाजाच्या नावाचा वापर करून काढलेल्या पत्रानं कुणबी समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची मागणी म्हणजे कुणबी समाजाची मागणी, असं समजणं चुकीचं आहे. कुणबी समाजाला गृहीत धरू नका, असंही यावेळी म्हणण्यात आलं. या पत्रकार परिषदेत डॉ. विजय देवतळे, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, सूर्यकांत खनके, सुनीता लोढीया आदी उपस्थित होते.

धानोरकर दाम्पत्यानं समाजाचं राजकारण केलं : "कुणबी समाजाचे नेते स्वर्गीय अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी बाळू धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, मागील चार वर्षात या दाम्पत्याने समाजाची कोणती परतफेड केली हे त्यांनीच सांगावे. उलट मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या बाबतीत या कुटुंबियांनी जाहीर अपशब्द काढले. टेंभुर्डे यांनी धानोरकर यांना पुढची लोकसभेची तिकीट देऊ नये, यासाठी स्वतः सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं होतं, ही बाब समाज अजून विसरलेला नाही. मागील पाच वर्षात केवळ समाजाचे राजकारण एवढच धोरण धानोरकर दांपत्यानं ठेवलं होतं", असा आरोप देखील यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला. मात्र, या पत्रकार परिषदेत काँग्रेस शहर आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दोन्ही अनुपस्थित होते. शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी या पत्रकार परिषदेकडं पाठ फिरवली.

हेही वाचा -

  1. Lok Sabha Election 2024 : 'सुधीर मुनगंटीवार यांना बळीचा बकरा केलं'; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
  2. मुंबई महानगरपालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी विजय वडेट्टीवार यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र
  3. "ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो", औद्योगिक मेळाव्यावरून शिवानी वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.