मेहकर (बुलढाणा) Lok Sabha Elections 2024 : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद मेळाव्यात खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली. भर सभेत त्यांनी मतदारांना शिवसैनिकांना डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन केलं होतं. यावर आता खासदार प्रतापराव जाधवांनी त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचा सन्मान करतो : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, " घोडा मैदान जवळच आहे. तसंच कोण-कोणाचं डिपॉझिट जप्त करतं हे लवकरच दिसेल. तसंच आम्हीदेखील बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. जसं पिंडीवरच्या विंचवाला मारता येत नाही. पण जेव्हा विंचू खाली उतरतो, त्याला ठेचून काढता येतं. मात्र उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला आल्यानं आम्ही त्यांचा सन्मान करतो. अन्यथा आम्हालाही त्यांच्यापेक्षा शेलक्या भाषेत त्यांना प्रत्युत्तर देता येतं. मी त्यांच्यापेक्षा वयानंही आणि कर्तृत्वानं मोठा आहे," असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय.
अंबादास दानवेंवरही टीका : संभाजीनगर इथली पाणीपुरवठा योजना अंबादास दानवे यांच्यामुळंच पूर्णत्वास जाऊ शकली नाही. याचा फटका मागील निवडणुकीत शिवसेनेला बसला होता. बसस्थानकापेक्षाही पाणी महत्त्वाचं आहे, असं म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय. पुढे ते म्हणाले की, " खासदार असताना खैरे आणि विरोधी पक्षनेते दानवे यांनी संभाजीनगरच्या पाण्यासाठी काय केलं, हे त्यांना जाऊन विचारा. त्या एका मुद्द्यामुळं शिवसेनेचा तिथं पराभव झाला. यावेळीही पराभव होईल, असंही प्रतापराव जाधवांनी म्हटलंय. तसंच बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीचा जो कोणी उमेदवार दिला जाईल तो महायुतीमधून निश्चित निवडून येईल. स्वतःच्या उमेदवारीबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा :