सातारा Lok Sabha Election Results 2024 : सातारा लोकसभा निवडणुकीची (Satara Lok Sabha) मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. सकाळी ६.३० वाजता वाजता कर्मचारी टेबलावर रवाना होतील. ७ वाजता गोपनीयतेची शपथ आणि सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मतमोजणी परिसरातील बंदोबस्ताच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
मतमोजणीसाठी ७१६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती : ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि तब्बल ६२ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ५८४ कर्मचाऱ्याचे पहिले प्रशिक्षण २९ मे रोजी तर दुसरे प्रशिक्षण सोमवारी (३ जून) पार पडले. मतमोजणीसाठी ११ तहसीलदार, वीस नायब तहसीलदार, १७२ मतमोजणी पर्यवेक्षक, १६७ मोजणी सहाय्यक, १७९ सूक्ष्मनिरीक्षक, ९० अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७१६ जण तैनात करण्यात आले आहेत.
सातारा, वाई मतदार संघात मतमोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या : सातारा व वाई विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या २३ फेऱ्या होणार आहेत. त्या खालोखाल पाटण मतदारसंघाच्या २१, कोरेगावच्या १८, कराड उत्तरच्या १७ तर कराड दक्षिणच्या १६ फेऱ्या होणार आहेत. सहा वेगवेगळ्या स्वतंत्र कक्षांमध्ये मतदार संघनिहाय टेबल व्यवस्था करण्यात आलेली आहे. एका विधानसभा मतदारसंघासाठी २० अशा एकूण १२० टेबलावर एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होईल.
सकाळी साडे नउला पहिल्या फेरीचा निकाल होणार जाहीर : मतमोजीणीची फेरी पूर्ण व्हायला साधारणतः पाऊण तास लागेल. पहिला निकाल सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी जाहीर होईल, असा अंदाज आहे. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि प्रत्यक्ष मतमोजणी या टॅली केल्या जातील. वाई आणि सातारा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी ही शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारी ठरणार आहे. सर्व मतमोजणी प्रक्रिया विना आक्षेप पार पडली तर साडे तीन ते चार वाजेपर्यंत संपूर्ण कल स्पष्ट होईल.
हेही वाचा -
- महाराष्ट्राकडं अवघ्या देशाचं लक्ष; राज्यातील 48 मतदारसंघातील संभाव्य विजयी उमेदवारांची लिस्ट वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election Results 2024
- विजयाचा गुलाल कोण उधळणार? निवडणूक निकालासाठी अवघे काही तासच बाकी; 'या' उमेदवारांवर देशाचं लक्ष - lok sabha election results 2024
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024