ETV Bharat / politics

सांगली लोकसभा निवडणूक निकाल : सांगलीची पाटीलकी कोणाकडे; विशाल, संजय की चंद्रहार? - Sangli Lok Sabha Election Results 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 1:11 PM IST

Updated : Jun 4, 2024, 2:53 PM IST

Lok Sabha Election Results 2024 : सांगली लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार हे पाहणं महत्वाचं आहे. सांगलीत मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपाचे संजय पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, पहिल्या अर्ध्या तासानंतर काँग्रेसचे बंडखोर तसंच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या शर्यतीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मात्र मागे पडले आहेत.

Lok Sabha Election Results 2024
सांगलीचे पाटील कोण? (Etv Bharat MH DESK)

सांगली Lok Sabha Election Results 2024 : सांगलीत लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला होता. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली होती. भाजपानं संजय पाटील (Sanjay Patil) यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष निवडणूक लढवली. आता निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झालीय. सांगली लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

अशी आहे सांगलीची ओळख : सांगली लोकसभा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदार संघ आहे. या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसची एकहाती सत्ता राहिली आहे. इथं काँग्रेसनं सलग 52 वर्षे आपला विजय कायम राखला. या जागेवरुन कॉंग्रेस पक्षाचे 15 खासदार निवडून आले होते. काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील सर्वाधिक पाच वेळा खासदारपदी निवडून आले. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं सांगली हे शहर हळद उत्पादनासाठी ओळखलं जातं. या शहरात अनेक उद्योगांचे मोठे कारखाने आहेत. यात सूती कापड, तेल गिरण्या, पितळ, तांबे यांच्या उत्पादनात गुंतलेल्या कारखान्यांचा समावेश आहे. तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नावानंही सांगलीला ओळखलं जातं.

52 वर्षे कॉंग्रेसचा झेंडा : सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. इथं 1962 ते 2004 पर्यंत काँग्रेस पक्षाचं निर्विवाद वर्चस्व होतं. ही जागा 1957 साली अस्तित्वात आली. भारतीय किसान मजूर पक्षाचे बळवंत पाटील [ए] हे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते. 1962 मध्ये काँग्रेस पक्षानं विजयाचा झेंडा रोवला जो 52 वर्षे फडकत राहिला. 1962 मध्ये काँग्रेसचे विजयसिंहराव डाफळे, 1967 मध्ये एस. डी. पाटील, 1971 आणि 1977 मध्ये गणपती टी गोटखिंडे, 1980 मध्ये वसंतदादा पाटील, 1983 च्या पोटनिवडणुकीत शालिनी पाटील, 1984, 1989 आणि 1991 मध्ये प्रकाशबापू पाटील, 1996 आणि 1998 मध्ये मदन पाटील, 1999 आणि 2004 मध्ये प्रकाशबापू पाटील आणि 2006 च्या पोट निवडणुकीत आणि 2009 मध्ये प्रतीक पाटील हे काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आले होते.

मोदी लाटेत काँग्रेसचा धुव्वा : 2014 मध्ये या मतदार संघात मोदी लाटेचा प्रभाव पडलाय. तब्बल 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच ही जागा काँग्रेसच्या हातातून गेली. इथून भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील खासदार झाले. त्यांना 6 लाख 11 हजार 563 मतं मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे प्रतीक प्रकाश पाटील यांचा 2 लाख 39 हजार 292 मतांनी पराभव केला. प्रतीक पाटील यांना 3 लाख 72 हजार 271 मतं मिळाली. तसंच गेल्या 2019 मध्येही पुन्हा संजय पाटील विजयी झाले. त्यांना 5 लाख 8 हजार 995 मतं मिळाली. SWP चे विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 तर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 3 लाख 234 मतं मिळाली होती.

तीन पाटील रिंगणात : सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपाचे उमेदवार संजय पाटील तसंच काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात होते. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळं सांगलीत मविआच्या उमेदवाराला फटका बसून भाजपाच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचं बोललं जात होतं. गेल्या महिनाभरापासून सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमधील वाद हा संपूर्ण राज्यभर गाजला होता. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या वादाचं रुपांतर हे विशाल पाटलांच्या बंडखोरीत झालं. या मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांनीही दावा केला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार हवा, अशी भूमिका आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह विशाल पाटील यांनी घेतली होती. मात्र ,काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टाईनंतरही त्याला यश आलं नाही. त्यामुळं विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन सांगलीत आघाडीसह युतीच्या उमेदवारांपुढं आव्हान उभं केलं होतं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विशाल पाटील : गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विशाल पाटील यांनी या मतदारसंघात शड्डू ठोकला होता. मात्र, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीमधील अंतर्गत वादामुळं पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. तत्कालीन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्या घराण्याचा वाद मागील लोकसभा निवडणुकीत आडवा आल्याचं सांगितलं जातं. यंदाही तीच परिस्थिती दिसत होती. मात्र, यावेळी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील हे कुठंच दिसले नाहीत. पाटील यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध केल्याचंही काँग्रेसचे नेते उघडपणे सांगतात. काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सुरुवातीपासून सांगलीवर दावा सांगितला होता. दोनवेळा दिल्ली वाऱ्याही केल्यानंतर विशाल पाटील आपली भूमिका मागे घेतील, असं चित्र होतं. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करुन थेट राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनाच आव्हान दिल्याची चर्चा होती.

विशाल पाटील हे रिंगणात : वास्तविक पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार दिल्यानं काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. ती नाराजी उघड-उघड बाहेरदेखील आली. मात्र, काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी न देण्यामागं कोणाचा हात आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळं माघारीच्या दिवशीही विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता सांगली जिल्ह्याच्या नेतृत्वालाच शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, भाजपाकडून खासदार संजय पाटील आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे रिंगणात होते. आघाडीकडं सध्या आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित पाटील, आमदार विक्रमसिंह पाटील, आमदार सुमन पाटील, रोहित पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासारखे मात्तबर प्रचारक होते. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी उघड-उघड भूमिका सध्यातरी घेतली नाही. त्यांचा विशाल पाटील यांना अंतर्गत पाठिंबा असणार की विरोध हे पाहणं महत्त्वाचं आहे.

20 वर्षांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत : 2004 विधानसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी काँग्रेस आघाडीविरोधात प्रथमच बंडखोरीची नोंद केली होती. वसंतदादा घराण्यात त्यापूर्वी कुणीही पक्ष किंवा आघाडीविरोधात बंड केलं नव्हतं. त्यानंतर आता 20 वर्षांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आघाडीविरोधात पुन्हा बंड पुकारलंय. दादा घराण्यातील बंडाची ही दुसरी घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आलीय. 2004 नंतर राजकीय समीकरणं बदलत गेली. विधानसभेच्या निवडणुकीत बंड करुन मदन पाटील यांनी अपक्ष म्हणून नव्या चिन्हासह निवडणूक लढविली. तशीच परिस्थिती 2024च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्याबाबतीत निर्माण झाली आहे. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकला होता.

मतदारसंघाच्या इतिहासात काय झालं : मात्र सांगली लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात कधीही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याची नोंद नाही. या मतदारसंघावर सर्वाधिक काळ काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय. 2019च्या निवडणुकीतही काँग्रेसला जागा मिळाली, नसल्यानं विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत होते. मात्र, येथील जागा ज्या पक्षाला गेली, त्या स्वाभिमानी शेतकरी पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिल्यानं वादावर पडदा पडला होता. सांगली लोकसभेच्या इतिहासात आजवर 2009 व 1996च्या लढतीतच अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. या मतदारसंघातून कधीही अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही. 2004च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही सांगली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधीही अपक्ष विजयी झाला नव्हता. मदन पाटील यांच्या माध्यमातून ही परंपरा मोडीत निघाली होती. मात्र, 2004 नंतरच्या निवडणुकांत अपक्ष उमेदवारांना यश मिळालेलं नाही.

सांगली लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

वर्ष - 2019 : संजयकाका पाटील (विजयी उमेदवार- भाजपा) 42.77% मतं

वर्ष - 2014 : संजयकाका पाटील (विजयी उमेदवार- भाजपा) 58.43% मतं

वर्ष - 2009 : प्रतिक प्रकाशबापू पाटील (विजयी उमेदवार- काँग्रेस) 48.74% मतं

हेही वाचा -

  1. नवनीत राणा, उदयनराजे भोसले, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पिछाडीवर; दिग्गजांना मोठा धक्का - Maharashtra lok Sabha election
  2. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची आघाडी, सांगली लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - Lok Sabha election results 2024
  3. बारामती लोकसभा निकाल 2024 : सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार? - Baramati Lok Sabha Results

Last Updated : Jun 4, 2024, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.