पुणे Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचही टप्प्यातील मतदान झालं असून येत्या 4 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निकाल लागणार आहे. राज्यात एकूण 48 जागा असून सर्वच पक्षातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आता अनेल तर्क वितर्क येऊ लागले आहेत. अनेकांचे आपापले सर्व्हे देखील समोर येऊ लागले आहेत. अशातच पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यातील 48 जागांच्या बाबत लोकसभा निवडणूक अचूक निकाल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
कशी असेल अनोखी स्पर्धा : पुण्याचे माजी महापौर प्रसन्न जगताप यांच्याकडून या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलय. राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक झाली असून या संबंधी ऑनलाईन स्पर्धा असून राज्यातील 48 जागांच्या संदर्भात अचूक अंदाज काढणाऱ्या पहिल्या 3 स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना माजी महापौर प्रसन्न जगताप म्हणाले की, पुण्यात या अशा अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलय. यात जो कोणी राज्यातील 48 मतदार संघापैकी 45 हून अधिक मतदार संघात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार विजयी होणार याबाबत जो कोणी स्पर्धक अचूक माहिती देणार, त्याला रोख 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत."
अटी व नियम काय : तसंच ज्याचे 48 पैकी (43, 44, 45) अंदाज बरोबर आल्यास त्याला 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसंच 48 पैकी (40, 41, 42) अंदाज बरोबर आल्यास 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होत असताना स्पर्धक हा मतदार असावा तसंच एका मोबाईल नंबरद्वारे एकदाच सहभाग नोंदवता येणार असून एकापेक्षा जास्त विजेते ठरल्यास चिठ्ठीद्वारे एकच विजेता घोषित करण्यात येईल आणि या स्पर्धेचा निकाल 10 जून नंतर कळवण्यात येईल, असं यावेळी प्रसन्न जगताप म्हणाले.
हेही वाचा :
- ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड? लंकेनी गैरसमजातून आरोप केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Nilesh Lanke On EVM Machines
- मुंबईत संथगतीनं मतदान... मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - lok sabha election
- मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल - Lok Sabha Election 2024