ETV Bharat / politics

चालिसा पठणामुळं तुरुंगात गेलेल्या नवनीत राणांना लोकसभेत 'हनुमान' पावणार का? काय आहे समीकरण? - आनंदराव अडसूळ

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. राज्यात नेहमीच चर्चेत असणारा अमरावती लोकसभा मतदारसंघात यंदाही हाय चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा मात्र या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ
अमरावती लोकसभा मतदारसंघ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 9:55 AM IST

Updated : Feb 21, 2024, 10:00 AM IST

अमरावती Lok Sabha Election 2024 : भारताचे पहिले कृषिमंत्री, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना लोकसभेत पाठविणाऱ्या अमरावतीकरांच्या मनात 2024 च्या निवडणुकीत नेमकं काय करायचं यासंदर्भात मोठं गुपित दडलंय. नेमकं कोणाला दिल्लीला पाठवायचं आणि कोणाला गल्लीचा रस्ता दाखवायचा याबाबत विचारपूर्वक निर्णय घेणारे अमरावती जिल्ह्यातील मतदार सध्या शांत आहेत. मागच्या निवडणुकीत संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लहर असताना आणि खुद्द नरेंद्र मोदी हे भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार असणारे आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी अमरावतीत आले असताना देखील अमरावतीकर मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांना निवडून दिलं होतं. गंमत म्हणजे निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्या नवनीत राणा लोकसभेत अमरावतीचं प्रतिनिधित्व करताना पाचही वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच गुणगान करीत होत्या. नवनीत राणा यांचे कट्टर विरोधक असणारे आनंदराव अडसूळ हे शिंदे गटात गेल्यामुळं आणि त्यांचा मुळातच अमरावतीशी कुठलाच संबंध नसल्यानं आनंदराव अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरुद्ध यावेळी अमरावतीत जवळपास नसतीलच. एकूणच काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव अद्याप स्पष्ट नसलं तरी अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही विदर्भ किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजणार हे मात्र निश्चित आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव आहे मतदारसंघ : अमरावती लोकसभा मतदारसंघ 2009 च्या निवडणुकीपासून अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलाय. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळं आनंदराव अडसूळ हे लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातून 2009 मध्ये अमरावतीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले होते. तत्पूर्वी 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत या मतदारसंघावर शिवसेनेनं आपला भगवा फडकवलेला होताच. 2009 मध्ये आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीचे उमेदवार राजेंद्र गवई यांचा 61 हजार 716 मतांनी पराभव केला होता. अमरावती जिल्ह्याशी कुठलाही संबंध नसणारे आनंदराव अडसूळ यांना आपले प्रतिनिधी म्हणून अमरावतीकरांनी लोकसभेत पाठवलं. 2009 मध्ये अडसूळांसाठी सहज सोपी असणारी निवडणूक 2014 मध्ये मात्र चांगलीच किचकट ठरली. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना या निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यावेळी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस साठी सुटलेल्या अमरावतीच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून नवनीत राणा या निवडणूक रिंगणात उतरल्या. त्यावेळी नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या नाहीत, त्यांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं आहे असा आरोप करत आनंदराव अडसूळ थेट न्यायालयात पोहोचले. त्यानंतर 2014 ची निवडणूक ही राणा समर्थक आणि शिवसैनिकांमधील प्रचंड वादामुळं गाजली होती. देशात त्यावेळी पहिल्यांदा प्रचंड मोदी लहर होती. त्या निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा 1 लाख 37 हजार 932 मतांनी पराभव केला होता. आनंदराव अडसूळ यांना त्या निवडणुकीत एकूण 4 लाख 67 हजार 212 मतं मिळाली होती. तर नवनीत राणा यांना 3 लाख 29 हजार 280 मतं पडली होती. 2014 मध्ये आनंदराव अडसूळ विजयी झाल्यावरही त्यांनी नवनीत राणा यांच्या जात पडताळणीवर असणारा आक्षेप कायम ठेवत न्यायालयीन लढा संपूर्ण पाच वर्ष सुरुच ठेवला होता. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी त्यावेळी खासदार नवनीत राणा यांच्या पराभवासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आरोपही केले होते.

2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला धक्का : 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नवनीत राणा आमच्याशी खरोखरच प्रामाणिक राहतील की नाही असा आक्षेप घेत त्यांना अंतर्गत बैठकीत अनेकदा या संदर्भात प्रश्नही केले होते. नवनीत राणांनी 2014 मध्ये पराभूत झाल्यावर पराभवाची चिंता न बाळगता संपूर्ण मतदारसंघाचा झुंजार दौरा सुरु केला. सलग पाच वर्षे नवनीत राणा यांनी स्वतः मेघाटातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या प्रत्येक गावांना अनेकदा भेटी दिल्या. महिला मेळावे, जनतेशी संपर्क असा आपल्या जनसंपर्काचा प्रचंड सपाटा त्यांनी लावला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे नवनीत राणा यांच्या विजयासाठी दोन-तीन दिवस अमरावतीतच ठाण मांडून होते. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेसाठी त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर आले होते. अतिशय रंगतदार झालेल्या 2019 च्या निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी अनेकांना धक्का बसला. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार 951 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. या निवडणुकीत नवनीत राणा यांना 5 लाख 784 मतं मिळाली तर आनंदराव अडसुळ यांना 4 लाख 70 हजार 549 मतं पडली होती.

पाच वर्ष जिल्ह्यात गोंधळच गोंधळ : 2019 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी केंद्रात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करुन अमरावतीकरांना मोठा धक्काच दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार विरोधात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सातत्यानं आंदोलनं केलीत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंग्यासंदर्भात इशारा देत मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण आम्ही करु असं वक्तव्य केलं होतं. त्याचदरम्यान हनुमान जयंती पर्वावर अमरावती शहरातील रवी नगर परिसरातील हनुमान मंदिरात अनेक वर्षांपासून असणाऱ्या परंपरेप्रमाणे हनुमान जयंती पूर्वी पाच दिवसांपासून सामूहिक हनुमान चालिसा पठण सुरु होते. त्या ठिकाणी खासदार नवनीत राणा यांनी भेट देत सामूहिक हनुमान चालिसा पठनात सहभाग घेतला. राज ठाकरे यांचं हनुमान चालिसा संदर्भातील विधान त्यावेळी ताजं असताना राज ठाकरे यांच्या विधानाला साथ देत नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण केल्याचं वृत्त प्रसारित झालं. या वृत्ताला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. ह्या प्रसिद्धीचेच पुढं राणादांपत्यानं सोनं करण्याची संधी साधली. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांवर भोंगे लावण्यासाठी त्यांनी वाजगाजा करत दान दिलं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कचाट्यात पकडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरत मुंबई गाठली. या संपूर्ण प्रकारामुळं अमरावतीत शिवसैनिक आणि राणा समर्थकांमध्ये चांगलाच संघर्ष पेटला. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यावर अमरावती जिल्ह्यातील गोंधळ काहीसा शांत झाला. एकूणच या संपूर्ण गोंधळाच्या वातावरणात जिल्ह्यात प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना जे काही प्रकल्प आलेत त्या प्रकल्पांना काहीशी गती मिळण्या व्यतिरिक्त नवीन काहीही झालं नाही अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्यातील मतदारांची आहे.

काय आहे मतदारसंघाचा इतिहास : अमरावती जिल्हा हा 1957 ते 1991 च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जायचा. 1957 आणि 1962 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. पंजाबराव देशमुख हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांना मोठी संधीही मिळाली. त्यानंतर 1967 आणि 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसचेच के. जी देशमुख यांनी लोकसभेत अमरावतीचं प्रतिनिधित्व केलं. तर 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचेच नानासाहेब बोंडे विजयी झाले होते. 1980 आणि 1984 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उषा चौधरी यांना अमरावतीकरांनी निवडून दिलं होतं. मात्र 1989 च्या निवडणुकीत पहिल्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदाम देशमुख हे विजयी झाले होते. नंतर 1991 च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना अमरावतीकरांनी निवडून दिलं. त्यानंतर 1996 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा गड भेदत शिवसेनेचे अनंत गुढे विजयी झाले. 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रा.सू गवई यांना अमरावतीकरांनी साथ दिली. त्यानंतर 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत रा.सू गवई यांचा सलग दोन वेळा पराभव करुन शिवसेनेचे अनंत गुडे यांनी जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकवला. 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना अमरावतीकरांनी लोकसभेत आपला प्रतिनिधी म्हणून संधी दिली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार नवनीत राणा या निवडून आल्या आहेत.

रा.सू गवईंनी कसा मिळवला विजय : भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख असणारे रा.सू गवई यांचा शिवसेनेचे अनंत गुढे यांनी 1996, 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत सातत्यानं पराभव केला. असं असताना 1998 च्या निवडणुकीत मात्र रा सू गवई हे निवडून आले होते. त्याला कारण म्हणजे त्यावेळी पहिल्यांदाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई, आठवले आणि कवाडे हे तिन्ही कट एकत्र आले होते. तसंच त्यावेळी शरद पवार यांनी अमरावतीत पहिल्यांदा सोशल इंजिनिअरिंग द्वारे रा सू गवई यांच्या पाठीशी सर्वांनी राहावं असा सल्ला आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला होता. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेचे अनंत गुडे यांचा त्यावेळी पराभव होऊन रा सू गवई हे निवडून आले होते.

नवनीत राणा कमळ हाती घेणार? : खासदार नवनीत राणा मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा त्यांना पाठिंबा होता. आता नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार असतील की अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील आणि भाजपाचा त्यांना पाठिंबा असेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या उमेदवार असतील याबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. भाजपामधील स्थानिक अनेक नेत्यांना खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेरा चे आमदार रवी राणा हे अजिबात पटत नाहीत. असं जरी असलं तरी वरिष्ठ पातळीवर राणा दांपत्याचे असलेले संबंध पाहता खासदार नवनीत राणा यांना विरोध दर्शवण्याचा धाडस भाजपातील एकही स्थानिक व्यक्ती करणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी खासदार आपला असला की मोठा फरक पडतो. त्यामुळं नवनीत राणा या खासदार झाल्या तर जिल्ह्यात काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भाजपा बाजी मारण्यास सक्षम होईल असं भाजपाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उघडपणे बोलतात. खासदार नवनीत राणा या भाजपाच्या चिन्हावरच उभ्या राहाव्यात असं भाजपाकडून अनेकदा बोललं गेलंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही नवनीत राणा या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवतील असं वारंवार म्हटलंय. आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील भाजपासोबत असल्यामुळं खासदार नवनीत राणा या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील की अपक्ष उमेदवार म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतील याबाबत देखील मतदारांना उत्सुकता आहे.

खोडके आणि बच्चू कडूंच्या भूमिकेबाबत उत्सुकता : 2009 आणि 2014 मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघात सुलभा खोडके यांचा रवी राणा यांनी पराभव केला होता. तेव्हापासून राणा आणि खोडके यांच्यात प्रचंड वाद होते. त्यातच 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं नवनीत राणा यांना अधिकृत उमेदवारी दिल्यामुळं खोडके दांपत्य पक्षातून बाहेर पडले होते. आता भाजपासोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासोबत असणारे संजय खोडके हे लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता देखील मतदारांना आहे. तसंच बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार पक्षाच्यावतीनं उमेदवार देणार असं जाहीर केलंय. त्यामुळं बच्चू कडू यांच्याही भूमिकेकडं देखील मतदारांचं लक्ष असणार आहे.

मतदारसंघावर काँग्रेसचा दावा : 1991 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा पाटील या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. मात्र त्यानंतर काँग्रेसनं भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रा. सू गवई यांना साथ दिल्यामुळं अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचा 'पंजा' गायब झाला. आता मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसनं दावा केला असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील अमरावतीची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसच्या वतीनं दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्या उमेदवारीला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवरील एका वृत्तपत्र समूहाचे संपादक आणि अमरावतीचे मूळ रहिवासी राहुल गडपाले यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारी मागितलीय. तुर्तास तरी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी या दोघांची नावं चर्चेत आहेत.

वंचित बहुजन आघाडी बदलवू शकते समीकरण : अमरावती लोकसभा मतदारसंघात मुस्लिम आणि अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या जवळपास सहा ते साडेसहा लाखापर्यंत आहे. 2019 च्या निवडणुकीत मुस्लिम आणि अनुसूचित जातीचे मतदार मोठ्या ताकदीनं नवनीत राणा यांच्यासोबत होते. यावेळी मात्र मतदारांचा हा मोठा गठ्ठा काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील नवनीत राणा यांना धडा शिकवण्याची वाट पाहत आहेत. दुसरीकडं खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघंही लोकसभेत आपणच बाजी मारु याबाबत आत्मविश्वास बाळगून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आपल्याला या निवडणुकीत तारेल असा पूर्ण विश्वास राणा दांपत्याला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होईल हे निश्चित आहे. असं असताना वंचित बहुजन आघाडीनं आपला स्वतंत्र उमेदवार दिला तर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील चुरसच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

कसा आहे मतदारसंघ : अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर आणि मेळघाट असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी एकाही मतदारसंघात भाजपाचा आमदार नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 24 लाख 662 मतदार आहेत. यापैकी 12 लाख 38 हजार 44 पुरुष तर 11 लाख 62 हजार 536 महिला मतदार आणि 82 तृतीयपंथी मतदार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात मेळघाटातील आदिवासी यांच्यासह अनुसूचित जाती आणि मुस्लिमांची मतं ही निर्णायक आहेत. याशिवाय इतर सर्व जातीच्या मतदारांची मतं देखील सर्वच राजकीय पक्षांचं समीकरण बदलविण्याची क्षमता ठेवतात.

हेही वाचा :

  1. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चढाओढ, पुणेकर कुणाला देणार साथ; जाणून घ्या, राजकीय समीकरणे
  2. नागपूर मतदारसंघात कोण मारणार बाजी? 'ही' आहेत राजकीय समीकरणे

Last Updated : Feb 21, 2024, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.