ETV Bharat / politics

मोदींची हवा, कुठे नरम, कुठे गरम; विरोधकांनी दिली खरमरीत प्रतिक्रिया तर महायुतीला दिसतोय मोदींचा करिश्मा - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारतीय जनता पार्टी यांची हवा या निवडणुकीत नाही असं वक्तव्य भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलंय. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महायुतीतील घटक पक्ष हे मोदींची हवा आहे यावर ठाम आहेत. तर आता भाजपालाही कळून चुकलं आहे सत्य काय आहे, अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केलीय.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 6:44 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : देशात सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीए अर्थात भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी 400 पारचा दावा केलाय. त्यासाठी देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतांची होत असलेली मागणी पाहता, देशात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे. पुढेही त्यांचीच लहर राहणार आहे असा दावा, देशात एनडीएकडून आणि राज्यात महायुतीकडून सुरू आहे. त्यातच अमरावतीच्या लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मात्र याला छेद दिलाय.

मोदींच्या हवेच्या फुग्यात राहू नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात हवा आहे. या भ्रमात राहू नका नरेंद्र मोदींची हवा नाही. त्यामुळं त्यांच्या 'फुग्यात राहून गाफील राहू नका, कामाला लागा', असं आवाहन नवनीत राणा यांनी अमरावती येथे जाहीर भाषणात केलं होतं. मात्र, यासंदर्भात भाजपाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी नाराजी व्यक्त करताच नवनीत राणा यांनी आपलं वक्तव्य मागं घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

देशात मोदींचीच हवा : यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले की, भाजपाच्या उमेदवार असं वक्तव्य करतील यावर मला विश्वास नाही. कदाचित त्यांनी केलेलं वक्तव्य वेगळं असू शकतं. परंतु, जर असं वक्तव्य केलं गेलं असेल तर ते अयोग्य आहे. कारण देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांच्या आधारेच आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहोत. नरेंद्र मोदी यांनी केलेली विकास कामे, अयोध्येत उभारलेलं राम मंदिर अशा अनेक मुद्द्यांवर देशभरात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचीच हवा आहे असा दावा, कुलकर्णी यांनी केलाय.

पंतप्रधानांच्या कामावरच मतदारांशी संपर्क : या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय भोर यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कारण गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी केलेली अनेक विकासाची कामं, तसंच जनतेमध्ये असलेली त्यांची प्रतिमा पाहता पुन्हा एकदा एनडीएनं 400 पारचा दावा केलाय. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनच. त्यामुळं देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा नाही असं म्हणता येणार नाही त्यांचीच हवा आहे.

वास्तविकतेने पायाखालची वाळू घसरली : यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, केवळ अमरावतीतच नाही तर देशभरात भारतीय जनता पार्टी आणि मोदींच्या लोकप्रियतेच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. मोदींची काय किंवा भाजपाची काय कुठेच हवा नाही. जनतेला आता त्यांच्या धोरणातील फोलपणा कळून चुकलेला आहे. म्हणूनच भाजपाच्या उमेदवाराने सुद्धा "मोदींची हवा नाही, मोदींच्या हवेच्या फुगेत राहू नका" असं कार्यकर्त्यांना सांगितलंय. प्रत्यक्ष जनतेमध्ये काय वास्तविकता आहे हे कळल्यानं आता भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कुठेही मोदींची हवा नाही देशभरात मोदीविरोधी वातावरण तयार झालं आहे. उलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात केलेल्या पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद हा अधिक होता. त्याचाच हा परिणाम आहे.

हेही वाचा -

  1. 'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा'; कट्टर राजकीय विरोधक अडसूळ-राणा एकत्र, अनेक वर्षांचं शत्रुत्व संपलं - Lok Sabha Election 2024
  2. मोठी बातमी! भाजपात घरवापसी करण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना धमकी; दाऊद, छोटा शकीलकडून ठार मारण्याची धमकी - Eknath Khadse
  3. शिवसेनेच्या नेत्याला भाजपाची पालघरमधून उमेदवारी; भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता ? - BJP Fake Letter Head

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.