ETV Bharat / politics

खासदार म्हणून निवडून आल्यास करणार "ही" पाच कामे; मविआचे उमेदवार बळवंत वानखडे यांची मुलाखत - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलं. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज 'एक्झिट पोल' (Exit Poll 2024) जाहिर होत आहे. अशातच अमरावती लोकसभा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

Balwant Wankhade
बळवंत वानखडे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 10:21 PM IST

अमरावती Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतल्या अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडलं. "एक्झिट पोल निकाल" (Exit Poll 2024 ) येण्यास सुरुवात झालीय. अशातच अमरावती लोकसभा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी 'ईटीव्ही भारतशी' विशेष बातचीत केलीय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मी मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे. अमरावती लोकसभेचा खासदार म्हणून निवडून आल्यास जिल्ह्यासाठी विकासाची कामे तीव्र गतीनं करणार आहे. शेतकरी आत्महत्या आणि कुपोषण या विषयावर प्राधान्याने काम करणार असल्याचं वानखडे यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना बळवंत वानखडे (Etv Bharat Reporter)

शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून करणार काम : लोकसभा निवडणूक ह्या साधारणतः राष्ट्रीय मुद्द्याला अनुसरून घडल्या जातात. परंतु स्थानिक प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळं स्थानिक प्रश्नांमध्ये पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज आणि रस्ते हे महत्वाचे प्रश्न आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. देशपातळीवरील प्रश्नांप्रमाणेच स्थानिक प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे असतात. स्थानिक प्रश्नांसाठीच लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष करून चालत नाही.

महागाईने शेतकरी होरपळून निघाला : शेतकरी आत्महत्या जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. शेतकरी आत्महत्या विषयी गांभीर्यानं बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होणं ही भूषणावह बाब नाही. त्याच समर्थन करणं योग्य नाही. परंतु मुळात शेतकरी जे काही पिकवतो तर सरकार शेतकऱ्याच्या कृषी मालाला योग्य भाव देत नाही, त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याच्याकडं उपजीविकेचे अन्य कुठलेही साधन नाही. जिल्ह्यात कोरडवाहू शेतीची संख्या जास्त आहे. त्यामुळं फक्त चार महिने त्याच्या हाताला काम असते आणि इतर वेळी तो रिकामा असतो. वाढत्या गरजा, बेरोजगारी, महागाईने शेतकरी अगदी होरपळून निघाला आहे.

कुपोषणावरती मात करणं शक्य : कुपोषण ही निरंतर प्रक्रिया आहे. मेळघाटसह जिल्ह्यात अनेक ठिकाणीही कुपोषणाचं प्रमाण मोठं आहे. कुपोषण या विषयावर सातत्यानं आणि निरंतर काम करण्याची गरज आहे तो एका दिवसात संपणारा विषय नाही. महिला, बाल कल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयानं काम केल्यास कुपोषणावरती सहजपणं मात करता येणं शक्य आहे.

दादासाहेब गवई माझं दैवत : रा.सू. गवई नंतर संसदेत जाणारा मी बौध्द खासदार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रा.सू. गवई यांच्यानंतर दिर्घ कालखंड गेला. परंतु अनुसुचित जातीसाठी मतदार संघ आरक्षित झाल्यानंतर पहिल्यांदाच बौद्ध समाजाचा उमेदवार संसदेमध्ये जाणार याकडं आपणा कसे बघता, यावर उत्तर देताना ते म्हणाले की, रा. सु. गवई हे माझं दैवत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच मी राजकारणात आलो आहे. दादासाहेब गवई यांच्यानंतर मी संसदेत जाणार याचा मला मनस्वी आनंद आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

हेही वाचा -

  1. बहुप्रतीक्षित एक्झिट पोलचे निकाल जाहीर, पोलमध्ये भाजपाचं पारडं जड - Lok Sabha Election EXIT POLLS
  2. 'गांधी पर्याय नाही उपाय आहे'; पंतप्रधान मोदींच्या 'त्या' दाव्यावरुन जाणकारांच्या प्रतिक्रिया - PM Modi on Gandhi
  3. लोकसभा निवडणूक सातवा टप्पा : आठ राज्यात 3 वाजेपर्यंत 49.68 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.