ETV Bharat / politics

कोल्हापूरच्या राजघराण्यातील सदस्याविरोधात कशी असणार रणनीती? पाहा राजेश क्षीरसागर यांची EXCLUSIVE मुलाखत - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपण विजयी होणारच, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
राजेश क्षीरसागर यांची EXCLUSIVE मुलाखत (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2024, 9:25 PM IST

कोल्हापूर : सामान्य शिवसैनिक ते आमदार आणि आता राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष या माझ्या प्रवासात सामान्य कार्यकर्ते माता-भगिनी आणि सर्व समाज घटकातील बांधवांच्या पाठबळावर मी यंदाही विधानसभेत पोहोचणार आहे. यापूर्वी दोनदा राजघराण्यातील सदस्याबरोबर माझा सामना झालाय, मात्र जनता या लढाईत माझ्याच पाठीशी उभी राहील. काँग्रेसनं सामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी रद्द करून केलेला अपमान जनता कधीही विसरणार नाही, यामुळं कोल्हापूर उत्तरच्या लढाईत आपण विजयी होणारच, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

यापूर्वी दोनदा झालाय सामना : 2004 विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा राजघराण्यातील सदस्य मालोजीराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 'हात' या चिन्हावर निवडणूक लढवली. शिवसेनेच्या सुरेश साळुंखे यांच्याशी त्यांचा सामना झाला होता. या लढाईत छत्रपती मालोजीराजे निवडून आले होते. यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रिंगणात असलेल्या राजेश क्षिरसागर यांनी मालोजीराजांचा पराभव करत विधानसभेत धडाकेबाज एन्ट्री केली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत थेट राज घराण्यातील सदस्याचा पराभव करून राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता. तेव्हापासून कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, अडीच वर्षापूर्वी राज्यातील दोन पक्षात पडलेल्या फुटीनंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा राजकारणातील सदस्य आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमा छत्रपती यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. आता राजघराण्यातील सदस्याविरोधात लढण्याचा अनुभव असलेल्या राजेश क्षीरसागर यांनी राज घराण्यातील सदस्यांबद्दल आदर आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

राजेश क्षीरसागर यांची EXCLUSIVE मुलाखत (Source - ETV Bharat Reporter)

काँग्रेसनं उमेदवारी लादली का? : कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या विद्यमान आमदार जयश्री जाधव करत आहेत. त्यांना डावलून राजेश लाटकर यांना पहिल्यांदा काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, अंतर्गत विरोध झाल्यामुळं त्यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की काँग्रेस पक्षावर आली. आता मधुरिमा राजे छत्रपती यांना आयत्या वेळी मैदानात उतरवून काँग्रेसनं कोल्हापूरच्या जनतेवर ही उमेदवारी लादली का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला असल्याचंही यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले.

मी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता : लोकसभेतील शाहू छत्रपती यांचा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळं झाला आहे. मात्र, आताची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध राजघराण्यातील सदस्य अशी आहे. मी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता आहे. राजघराण्यातील सदस्यांना काही मर्यादा आहेत. मात्र, माझ्यापर्यंत पोहोचायला कार्यकर्ते आणि नागरिकांना कधीही, केव्हाही मर्यादा येणार नाहीत. या निवडणुकीत जनतेकडून सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील, असं सांगत यंदाच्या निवडणुकीतही कोल्हापूरची जनता माझ्याच मागं उभी राहील, असा विश्वासही क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा

  1. भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?
  2. नाम साधर्म्याचा फटका निवडणुकीत राजकीय नेत्यांना बसणार; नावात काय आहे? नव्हे नावातच सर्व काही...
  3. वडगाव शेरी मतदारसंघात दोन बापू पठारे मैदानात; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं घेतला आक्षेप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.