ETV Bharat / politics

नितीश कुमार यांच्यासोबत 'या' आठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास - Prem Kumar

Nitish Kumar Cabinet : महाआघाडीला बाय बाय केल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाले. रविवारी त्यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासह 2 उपमुख्यमंत्री आणि 6 कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. जाणून घ्या कोण आहेत हे मंत्री आणि कसा राहिला त्यांचा राजकीय प्रवास..

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 8:01 PM IST

पाटणा Nitish Kumar Cabinet : बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालंय. 28 जानेवारीला नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय भाजपाकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच जेडीयूचे नेते विजय चौधरी, विजेंद्र यादव, श्रवण कुमार, अपक्ष आमदार सुमित सिंह, हम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन आणि भाजपाचे आमदार प्रेम कुमार या 6 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

सम्राट चौधरी : बिहारचे नवे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत, जे स्वत: एक मोठे नेते होते. सम्राट चौधरी 1999 मध्ये पहिल्यांदा राजदच्या कोट्यातून आमदार झाले. ते राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. नंतर ते जीतन राम मांझीसोबत गेले. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ते 2020 मध्ये एनडीए सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. सम्राट चौधरी यांना 27 मार्च 2023 रोजी बिहार भाजपाचं प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं.

सम्राट चौधरी
सम्राट चौधरी

विजय सिन्हा : बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे लखीसराय विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. ते लखीसराय येथून तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. ते 2020 मध्ये बिहार विधानसभेचे अध्यक्ष होते. उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी विजय सिन्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही होते. आता ते बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.

विजय सिन्हा
विजय सिन्हा

विजय चौधरी : सध्या उजियारपूर विधानसभेचे आमदार. महाआघाडी सरकारमध्ये ते आधी अर्थमंत्री आणि नंतर शिक्षणमंत्री झाले. रविवारी महाआघाडीचं सरकार कोसळल्यानंतर त्यांनी एनडीए सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. विजय चौधरी हे जेडीयूचे मोठे नेते आहेत. नितीश कुमार यांच्या जवळचे असलेले विजय चौधरी 1982 मध्ये दलसिंहसराय विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. यानंतर ते सरायरंजनचे आमदार झाले. ते बिहार जेडीयूचे अध्यक्षही राहिले आहेत.

विजय चौधरी
विजय चौधरी

विजेंद्र यादव : विजेंद्र यादव भोजपूर जिल्ह्यातील संदेश मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2000 मध्ये राष्ट्रीय जनता दलातून (RJD) आमदार म्हणून निवडून आले. परंतु नंतर ते जेडीयू मध्ये सामील झाले. रविवारी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली.

विजेंद्र यादव
विजेंद्र यादव

श्रवण कुमार : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणारे श्रवण कुमार हे नालंदा विधानसभा मतदारसंघातून जेडीयूचे आमदार आहेत. ते बिहार मंत्रिमंडळात ग्रामीण विकास आणि संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांनी जेपी आंदोलनाच्या काळापासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. ते 1995 पासून नालंदा येथून आमदार आहेत.

श्रवण कुमार
श्रवण कुमार

सुमित कुमार सिंह : सुमित कुमार सिंह हे जमुईच्या चकई विधानसभेचे अपक्ष आमदार आहेत. ते बिहार सरकारमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते. त्यांनी 2010 मध्ये JMM कडून निवडणूक लढवली. 2005 मध्ये ते लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 2020 मध्ये ते चकई विधानसभेतून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे वडील नरेंद्र सिंह आणि आजोबा श्री कृष्ण सिंह हे देखील बिहार विधानसभेत मंत्री होते. तसेच त्यांचे दोन भाऊही आमदार आहेत.

सुमित कुमार सिंह
सुमित कुमार सिंह

संतोष सुमन : संतोष कुमार सुमन सध्या 'हम'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राजनगर, मधुबनी येथील आमदार आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत संतोष सुमन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. ते यापूर्वीही महाआघाडी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र राजकीय वादामुळे त्यांना आपलं पद सोडून एनडीएमध्ये सामील व्हावं लागलं होतं.

संतोष सुमन
संतोष सुमन

प्रेम कुमार : प्रेम कुमार गया टाउनमधून भाजपाचे आमदार आहेत. ते 1990 पासून सतत विजयी होत आहेत. 2005 मध्ये ते बिहार सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री होते. 2008 मध्ये इमारत बांधकाम मंत्री, 2010 मध्ये नगरविकास मंत्री, 2015 मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते, 2017 मध्ये कृषी मंत्री आणि 2019 मध्ये पशुसंवर्धन मंत्री झाले. आता त्यांनी पुन्हा एकदा एनडीए सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

प्रेम कुमार
प्रेम कुमार

हे वाचलंत का :

  1. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
  2. 'बिहारचे योगी' बनले नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत सम्राट चौधरी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.