ETV Bharat / politics

भ्रष्टाचारी नेत्यांचा गट म्हणजे 'इंडिया' आघाडी; जे पी नड्डांचा हल्लाबोल

JP Nadda in Mumbai : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी बुधवारी मुंबईत भाजपा बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर चांगलाच हल्लाबोल केलाय. भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही आघाडी असल्याचं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही जोरदार टीका केलीय.

भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी, वंशवाद प्रॉपर्टी व भ्रष्टाचाराची आघाडी म्हणजे 'इंडिया' आघाडी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 7:13 AM IST

मुंबई JP Nadda in Mumbai : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी बुधवारी अंधेरी इथं भाजपा बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. याठिकाणी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसंच "जगात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून आणून त्यांची हॅट्रिक करणं गरजेचं आहे," असं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी "भ्रष्टाचारी नेत्यांचा गट म्हणजे इंडिया आघाडी," असा हल्लाबोलही महाआघाडीवर केला.

यूपीएतील भ्रष्टाचाराची माहिती नवमतदारांना नाही : यावेळी कार्यकर्त्यांना बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, "1980 ला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आज देशात मोदींच्या नेतृत्वात कमळ पूर्णपणे फुललंय. भाजपानं मागील वर्षात अनेक संघर्ष पाहिले आहेत. आपल्या खासदारांची संख्या दोन असतानाचा तो काळही आपण पाहिला आणि आज आपण देशातील सर्वात मोठी पार्टी म्हणून विराजमान आहोत. हा आपल्यासाठी फार गौरवाचा विषय आहे. परंतु हे करत असताना आपली जबाबदारी सुद्धा वाढलीय. कारण 10 वर्षांपूर्वीची व्यक्ती 8 वर्षांची होती. ती आज 18 वर्षाची होऊन मतदानाचा अधिकार बजावणार आहे. त्यानं यूपीएचा भ्रष्टाचार बघितला नाही. त्याला टू जी, थ्री जी, फोर जी माहीत नाही. पॉलिसी पॅरालिसिस त्याला माहीत नाही. सर्वात भ्रष्टाचारी वेळ यूपीएचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात होती. हे त्यांना माहीत नाही. पण जेव्हा त्यांनी एनडीए पाहिलं, तेव्हा महायुतीमध्ये विकास पाहिला. ही आपली जबाबदारी आहे की, आपण त्यांना सांगायला पाहिजे की आपण कुठं चाललो आहोत. पूर्वी आपण देशात चार-पाच राज्यात आपलं सरकार असल्यास आनंद मानायचो. आज 17 राज्यांमध्ये भाजपाचं सरकार असून त्यातील 12 राज्यात महायुतीचं सरकार आहे."

भ्रष्टाचार लपवण्यासाठी आघाडी : याप्रसंगी नड्डा यांनी काँग्रेस तसंच 'इंडिया' आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, "आज काँग्रेस पक्षाची स्थिती काय आहे? जिथं जिथं राहुल गांधी जातात, ती भारत जोडो किंवा न्याय यात्रा नाही, तर ती अन्याय यात्रा किंवा भारत तोडो यात्रा होते. जेएनयूमध्ये कशा पद्धतीचे नारे लावले जातात. ते नारे देणाऱ्यांबरोबर दुसऱ्या दिवशी राहुल गांधी सोबत असतात. काँग्रेस पक्षाचा एकही नेता यावर बोलत नाही. यासाठी तुम्हाला देशाची माफी मागायला पाहिजे. 'इंडी' आघाडी काय आहे, ही आघाडी म्हणजे किती लोकांवर खटले आहेत, त्यांची ही आघाडी आहे. आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी, आपली संपत्ती वाचवण्यासाठी ही आघाडी आहे. भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी, ही वंशवाद प्रॉपर्टी आणि भ्रष्टाचाराची आघाडी आहे. फारुख अब्दुल्ला नंतर ओमर अब्दुल्ला आहेत. प्रकाश सिंग बादल नंतर त्यांचा मुलगा आहे. मुलायम सिंग यादव नंतर अखिलेश यादव आणि नंतर डिंपल यादव आल्या. नंतर तेजस्वी, तेजस्वी नंतर मिझा, मिझा झाल्यानंतर तेजप्रताप, ममता बॅनर्जी आणि त्यांचा परिवार आहे. चंद्रशेखर राव त्यांची मुलगी कविता, नंतर केसीआर हा परिवार आहे. करुणानिधी नंतर स्टॅलिन, शरद पवार पासून सुप्रिया सुळे हा परिवार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल, प्रियंका हा परिवारवाद आहे ना? फारूख अब्दुल्ला क्रिकेट भ्रष्टाचारामध्ये फसलेत. अखिलेश यादव लॅपटॉप स्कॅममध्ये फसलाय. लालूप्रसाद यादव चारा घोटाळामध्ये फसले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या मंत्र्यांच्या घरातून करोडो रुपये निघाले, यांच्या इथं भ्रष्टाचार झालाय. महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालाय. उद्धव ठाकरे यांच्या राज्यात भ्रष्टाचार झालाय. राज्याचे गृहमंत्री वर्षभर जेलमध्ये होते. राहुल गांधी बेलवर आहेत. सोनिया गांधी बेलवर आहेत. म्हणून ही आघाडी भ्रष्टाचार लपवण्यासाठी आघाडी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाची उडी मारण्यासाठी भारत तयार आहे. मोदी हॅट्रिक करणार आणि तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था भारताची जगात बनणार," असं त्यांनी यावेळी सांगितलं. "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात पोहोचून लोकांना मोदींच्या विकास कार्याची माहिती द्या," असा सल्ला नड्डांनी उपस्थित बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना दिलाय.

हेही वाचा :

  1. काकांविरोधात बंड करणाऱ्या अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याची 'आजोबां'ना साथ, राजकारणात होणार सक्रिय?
  2. शिरूर लोकसभा मतदार संघात रंगणार तिरंगी लढत; जागा वाटपाच्या शक्यतेवरून संभाव्य उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.