ETV Bharat / politics

कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरू शिष्याची लढाई; जितेंद्र आव्हाडांना मिळणार मोठं आव्हान?

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. तर ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरू आणि शिष्यामध्ये थेट लढत होणार आहे.

Jitendra Awhad And Najeeb Mulla
जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

ठाणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरू शिष्याची लढाई पाहायला मिळणार आहे.

कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरू आणि शिष्य आमने सामने : आमदार जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक नजीब मुल्ला यांची थेट लढत कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार तयारी सुरू झालीय. कळवा मुंब्रा मतदारसंघामधील ही लढाई गुरू शिष्यमध्ये असली तरी, एकेकाळी हे गुरू शिष्य एका ताटात जेवले होते. आता याच शिष्याने गुरू म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलं आहे.

प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला (ETV Bharat Reporter)

आमच्यात गुरु शिष्याचे नातं होतं. प्रत्येक निवडणुकीत कोण कोणासमोरही उभा राहतो. त्यामुळं यावेळेस देखील कोणीही उभं राहिलं तरी काही फरक पडत नाही. शरद पवार यांच्या उपस्थितीत फॉर्म भरून प्रचाराला सुरुवात करणार आहे. - जितेंद्र आव्हाड, आमदार

गुरूच्या पुतण्या विरोधात मुख्यमंत्र्यांची लढाई : कोपरी पाचपाखडी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांचे पुतणे हे उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळं ही लढाई देखील भावनिक असणार आहे. 'धर्मवीर' सिनेमामध्ये आनंद दिघे आणि त्यांचं आयुष्यभर केलेलं काम दाखवण्यात आलय. त्यामुळं त्याचा देखील फायदा केदार दिघे यांना मिळू शकतो. मात्र त्यांची लढाई सोपी नाही, कारण या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

हेही वाचा -

  1. स्नेहलता कोल्हेंची नाराजी दूर करण्यासाठी चक्क अमित शाह यांची मध्यस्थी; पारंपरिक विरोधक काळे कोल्हे एकत्र येणार का?
  2. विधानसभा निवडणुकीत प्रचारात कोणते मुद्दे असणार? 'या' मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होणार?
  3. मनसेचे ९९ आमदार निवडून येणार, मनसेच्या एकमेव आमदाराचा दावा; शिवसेना परतफेड करणार का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.