ETV Bharat / politics

सलमान खाननंतर आता जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; बिष्णोई गँगचा हात? - Jitendra Awhad Threat Call - JITENDRA AWHAD THREAT CALL

Jitendra Awhad Threat Call : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना धमकीचा फोन आलाय. धमकी देणाऱ्याने आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर सलमान खान (Salman Khan House Firing) सारखं प्रकरण करण्याची धमकी देण्यात आलीय.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 5:48 PM IST

Updated : Apr 22, 2024, 6:06 PM IST

प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड

ठाणे Jitendra Awhad Threat Call : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार परिषदेचं ठाण्यात आयोजन केलं होतं. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांच्या फोनवर धमकीचा फोन आला. सलमान खानबाबत (Salman Khan House Firing) जे झालं ते आम्ही केलं असून, ते तुमच्यासोबत देखील होईल, असा इशारा फोनवरुन देण्यात आला. दोन लाख रुपयांची खंडणी यावेळी मागितली असून, पैसे दिले नाही तर परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकी देण्यात आली.

बिष्णोई गँगचा हात? : मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणाऱ्यानं बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचा उल्लेख केलाय. तसंच त्यानं सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचाही उल्लेख केला होता. त्यामुळं जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणात बिष्णोई गँगचा हात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही : धमकीचा फोन आला तेंव्हा अनेक पत्रकार समोर उपस्थित होते. "या संदर्भात पोलिसांना आम्ही माहिती दिली असून, अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. चांगलं काम करताना या गोष्टी होतात. विद्रोही स्वभाव असलेल्या लोकांना हे सहन करावं लागतं," असं आव्हाड यांनी सांगितलंय. अद्याप आव्हाडांनी कोणतीही पोलीस तक्रार दिलेली नसून, पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

जितेंद्र आव्हाड यांना याआधी आली होती धमकी : याआधी अनेकदा जितेंद्र आव्हाड यांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराची अज्ञातांनी रेकी देखील केली होती. यासंदर्भात पोलीस चौकशी करण्यात आली होती. या प्रकारच्या आधी देखील अनेकदा आव्हाड याना धमक्या आल्याचं समोर आलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता.

हेही वाचा -

  1. प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती, त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये; जितेंद्र आव्हाडांचं पत्रकार परिषदेतून आवाहन - Lok Sabha Election 2024
  2. नवनीत राणांविरोधात उद्धव ठाकरेंनी थोपाटले दंड; म्हणाले, 'बदला घेणारच' - Lok Sabha Election 2024
  3. 'तुमचं नमो नमो चालते, पण जय भवानी नाही'; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले 'तुमचं हिंदुत्व नकली' - Sanjay Raut Attack On Pm Modi

Last Updated : Apr 22, 2024, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.