नवी दिल्ली INDIA Alliance UP : पश्चिम बंगाल आणि पंजाबमधील मित्रपक्षांकडून धक्का बसल्यानंतर, काँग्रेससाठी उत्तर प्रदेशातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसला लोकसभेच्या 11 जागांची ऑफर दिली. मात्र या ऑफरवर काँग्रेस संतुष्ट नसल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत.
-
कांग्रेस के साथ 11 मज़बूत सीटों से हमारे सौहार्दपूर्ण गठबंधन की अच्छी शुरुआत हो रही है… ये सिलसिला जीत के समीकरण के साथ और भी आगे बढ़ेगा।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 27, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
‘इंडिया’ की टीम और ‘पीडीए’ की रणनीति इतिहास बदल देगी।
">कांग्रेस के साथ 11 मज़बूत सीटों से हमारे सौहार्दपूर्ण गठबंधन की अच्छी शुरुआत हो रही है… ये सिलसिला जीत के समीकरण के साथ और भी आगे बढ़ेगा।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 27, 2024
‘इंडिया’ की टीम और ‘पीडीए’ की रणनीति इतिहास बदल देगी।कांग्रेस के साथ 11 मज़बूत सीटों से हमारे सौहार्दपूर्ण गठबंधन की अच्छी शुरुआत हो रही है… ये सिलसिला जीत के समीकरण के साथ और भी आगे बढ़ेगा।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 27, 2024
‘इंडिया’ की टीम और ‘पीडीए’ की रणनीति इतिहास बदल देगी।
काँग्रेस प्रदेश नेतृत्व नाराज : अलीकडेच, उत्तर प्रदेशात सपा आणि आरएलडीची युती झाली. या युती अंतर्गत आरएलडीला 7 जागा देण्यात आल्या. अखिलेश यादव यांनी 'X' वर पोस्ट करत काँग्रेसला 11 जागांची ऑफर दिली. मात्र सूत्रांनुसार, काँग्रेस उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 23 जागांवर निवडणूक लढण्यास उत्सुक आहे. अखिलेश यादव यांच्या 11 जागा देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेश नेतृत्वानं नाराजी व्यक्त केली. अखिलेश यादव यांचा हा एकतर्फी निर्णय असून तो आम्हाला मान्य नाही, असं राज्यातील काँग्रेस नेतृत्वानं म्हटलंय. अखिलेश यादव यांच्या पोस्टवर जेष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया दिली. "या संदर्भात अजूनही चर्चा सुरू असून, चित्र स्पष्ट झाल्यावर आम्ही घोषणा करू", असं ते म्हणाले.
जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा सुरू : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय लोक दल, अपना दल आणि आझाद समाज पक्ष एकत्र लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा सुरू होती. यानंतर आज जागावाटपाबाबत अंतिम करार झाल्याचं सांगण्यात आलं.
2019 मध्ये औपचारिक युती नव्हती : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपानं काँग्रेससोबत औपचारिक युती केली नव्हती. परंतु पक्षानं सोनिया गांधी यांच्या रायबरेली आणि राहुल गांधींच्या अमेठी या जागांवर उमेदवार उभा केला नाही. काँग्रेसने राज्यातील 80 पैकी 67 जागांवर उमेदवार उभे केले होते. पक्षाला 6.4 टक्के मतांसह केवळ एक जागा जिंकता आली. खुद्द पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही त्यांची जागा वाचवता आली नव्हती.
हे वाचलंत का :