भुवनेश्वर Mallikarjun Kharge Narendra Modi : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी, 2024 ची लोकसभा निवडणुका देशातील लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी असेल अशी भीती व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी पुन्हा जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीकडे वाटचाल करू शकतात, असं ते म्हणाले. तसेच खरगेंनी लोकांना भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते विषासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
#WATCH | Bhubaneshwar, Odisha: Addressing the Workers' Convention, Congress President Mallikarjun Kharge says, "What did Navin Patnaik gain from his friendship with Narendra Modi? The double engine fails at times. And when the double engine doesn't work properly, the first engine… pic.twitter.com/40QiuXdwy9
— ANI (@ANI) January 29, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Bhubaneshwar, Odisha: Addressing the Workers' Convention, Congress President Mallikarjun Kharge says, "What did Navin Patnaik gain from his friendship with Narendra Modi? The double engine fails at times. And when the double engine doesn't work properly, the first engine… pic.twitter.com/40QiuXdwy9
— ANI (@ANI) January 29, 2024#WATCH | Bhubaneshwar, Odisha: Addressing the Workers' Convention, Congress President Mallikarjun Kharge says, "What did Navin Patnaik gain from his friendship with Narendra Modi? The double engine fails at times. And when the double engine doesn't work properly, the first engine… pic.twitter.com/40QiuXdwy9
— ANI (@ANI) January 29, 2024
लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी : मल्लिकार्जुन खरगे ओडिशातील भुवनेश्वर येथे काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करत होते. "2024 हे वर्ष भारतातील लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी आहे. नरेंद्र मोदींनी दुसरी निवडणूक जिंकली तर देशात हुकूमशाही येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबत केलेल्या युतीचा आगामी निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले. महाआघाडीतून एकादी व्यक्ती निघून गेल्यानं आम्ही कमकुवत होणार नाही. आम्ही भाजपाचा पराभव करूनच राहू", असं ते म्हणाले.
यानंतर मतदान होणार नाही : "ईडी भाजपाच्या सांगण्यावरून सर्वांना नोटीस देत आहे. भाजपावाले लोकांना घाबरवतायेत. भीतीपोटी कोणी पक्ष, तर कोणी युती सोडत आहेत. ही तुमची शेवटची संधी आहे. यानंतर मतदान होणार नाही", अशी भीती खरगेंनी व्यक्त केली. "राहुल गांधींना देश एकत्र करायचा आहे. त्यांनी 'मोहब्बत की दुकांन' उघडलंय. परंतु, भाजपा आणि आरएसएसनं 'द्वेषाचं दुकान' उघडलंय. यामुळे आपण सतर्क राहणं आवश्यक आहे. भाजपा आणि आरएसएस विष आहेत. ते आमचे हक्क हिरावून घेतायेत", असा आरोप खरगेंनी केला.
हे वाचलंत का :