ETV Bharat / politics

हिंगणा मतदारसंघ भाजपासाठी सोयीचा; काँग्रेस, राष्ट्रवादीत रस्सीखेच - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात. हिंगणा हा नागपूर शहराच्या अगदी जवळचा मतदारसंघ आहे. यंदा या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच असणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024
हिंगणा विधानसभा मतदारसंघ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2024, 4:32 PM IST

नागपूर : हिंगणा विधानसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात येतो. रामटेक लोकसभा मतदारसंघात हिंगणाचा समावेश असून, सर्वसाधारण वर्गासाठी ही जागा आहे. औद्योगिक क्षेत्र म्हणून हिंगणाची ओळख आहे. २००९ पासून मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडं आहे. मतदारसंघात ३ लाख ७६ हजार ६३६ मतदार असून यामध्ये १ लाख ९८ हजार ४४८ पुरुष मतदार आहेत. तर १ लाख ०४ हजार ४७९ महिला मतदारांची संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हिंगणा विधानसभा मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झालं होतं.

मतदारसंघाची रचना : हिंगणा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नागपूर शहरापासून लगतच्या ग्रामीण भागाचा यात समावेश करण्यात आला आहे. हिंगणा तहसील, नागपूर ग्रामीण तहसीलचा यात समावेश आहे.

कोणाकडं आहे मतदारसंघ : सुरूवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडं हा मतदारसंघ राहिला आहे. १९९९ पासून या मतदारसंघाचा समावेश असलेल्या भागाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रमेश बंग यांनी केलं. २००९ यावर्षी भाजपा उमेदवार विजय घोडमारे येथून विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर २०१४ साली घोडमारे यांच्या ऐवजी समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली. ज्यामुळं विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर २०१९ मध्येही समीर मेघे येथून दुसऱ्यांदा निवडून आले. यंदाही समीर मेघे हेच येथून भाजपाचे उमेदवार राहणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

कुणबी, तेली समाजाचे मत निर्णायक : हिंगणा औद्योगिक क्षेत्र असल्यानं मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्याचबरोबर कुणबी, तेली यांच्यासोबतच मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार यांची निवडणुकीत निर्णायक भूमिका असते.

विद्यमान आमदाराविषयी : समीर मेघे हे भाजपाचे येथून विद्यमान आमदार आहे. समीर मेघे हे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचे एकेकाळी ज्येष्ठ नेते, चार वेळचे माजी खासदार दत्ता मेघे यांचे चिरंजीव आहेत. दत्ता मेघे हे शरद पवारांचे कधीकाळी विदर्भातील विश्वासू आणि जवळचे नेते समजले जायचे. समीर मेघे हे २०१४ पूर्वी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते. २०१४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. हिंगणा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आणि विजयी झाले. २०१९ मध्येही त्यांनी विजय घोडमारे यांचा पराभव केला.

सध्याची राजकीय स्थिती : आघाडीत हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटत असल्यानं हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आतापर्यंत राहिला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मतदारसंघासाठी आग्रही आहे. तर महायुतीमध्ये विद्यमान आमदार भाजपाचे समीर मेघे असल्यानं भाजपचाच उमेदवार येथून निवडणूक लढवले हे निश्चित मानलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काय घडले : हिंगणा हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. रामटेक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे येथून विजयी झाले. श्यामकुमार बर्वे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव केला. हिंगणा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना १७ हजार ८६२ मतांची आघाडी मिळाली. सहाही विधानसभा मतदारसंघातून हिंगणा येथून काँग्रेस उमेदवाराला मिळालेली हि सर्वाधिक मतांची आघाडी ठरली.

विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विद्यमान आमदार समीर मेघे यांना १ लाख २१ हजार ३०५ मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे विजय घोडमारे यांना ७५ हजार १३८ मते प्राप्त झाली.

इच्छुक उमेदवार आणि संघर्ष : महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडं आहे. त्यामुळं विद्यमान आमदार समीर मेघे यांच्यापुढे महायुतीतील उमेदवाराचे आव्हान असण्याची शक्यता नाही. तर महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडं राहिला आहे. परंतु, यंदा काँग्रेसने देखील मतदारसंघावर दावा ठोकला आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांनी तर मतदारसंघाविषयी जाहीर सभेत बोलून येथून काँग्रेस लढणार असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर जाहीर केले होते.

हे आहेत इच्छुक उमेदवार : काँग्रेसकडं हा मतदारसंघ गेल्यास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत येथून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार असू शकतात. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याही नावाची चर्चा या मतदारसंघासाठी आहे. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटला आणि अनिल देशमुखांचे चिरंजिव यांच्यासाठी काटोल मतदारसंघ सोडला तर अनिल देशमुख यांना येथून उमेदवारी मिळू शकते असा त्यामागचा तर्क आहे. ठाकरेंची शिवसेनाही येथून उमेदवार देण्यास इच्छुक आहे. युवा सेनेचे पदाधिकारी हर्षल काकडे हे देखील येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.

हेही वाचा -

  1. कोल्हापूर जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला कायम, वारसदारांसाठी नेते आग्रही
  2. राष्ट्रवादी, शिवसेना फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याचं समीकरण बदलणार
  3. जागावाटपाकडं इच्छुकांचे लागले डोळे, महायुतीसह महाविकास आघाडीची पहिली यादी कधी येणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.