ETV Bharat / politics

"ओबीसी समाजामध्ये संभ्रम...."; आरक्षणावरुन गोपीचंद पडळकरांचा सरकारला सल्ला - Gopichand Padalkar On Reservation - GOPICHAND PADALKAR ON RESERVATION

Gopichand Padalkar On Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक भूमिका घेतली. याप्रसंगी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य केलंय. नेमकं काय म्हणाले? गोपीचंद पडळकर वाचा सविस्तर...

Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 9:05 PM IST

पुणे Gopichand Padalkar On Reservation : राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यानंतर लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसी आरक्षणाबाबत उपोषण सुरू केलंय. याबाबत भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले की, "मराठा समाजाला महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. ओबीसी समाजात काही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सरकारनं निर्णय घ्यावा."

प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकर (ETV BHARAT Reporter)

भाजपाच्या समन्वयकांची बैठक : सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पुण्यातील मोतीबाग येथे भारतीय जनता पक्षाच्या समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपा नेते गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आरक्षणाबाबत आपलं मत व्यक्त केलं. आरएसएसच्या बैठकीबाबत पडळकर म्हणाले की, "बैठकीचं निमंत्रण होतं. त्यामुळं बैठकीला आलो आहे."

ओबीसी समाजानं जागरूक होण्याची गरज : ओबीसी समाजाच्या उपोषणाबाबत पडळकर म्हणाले की, "ओबीसी समाजानं जागरूक होण्याची गरज आहे. आपल्यामध्ये संघटन असेल तर आपल्याला योग्य न्याय मिळेल. त्यामुळं ओबीसी समाजानं एकजूट व्हावं."

लोकांनी हातात घेतलेली ही निवडणूक होती : मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत पडळकर म्हणाले की, "कार्यकर्त्यांची भूमिका असते पण नेतृत्व म्हणून भुजबळ त्या विषयावर बोलतील. मला याबाबत माहिती नाही. भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी नाराज नाही." तर सांगलीमध्ये भाजपाचा झालेल्या पराभवबाबत पडळकर पुढे म्हणाले की, "लोकसभेची निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली होती, आम्ही प्रचार केला. लोकांना काय वाटलं असेल किंवा चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करून विधानसभेला सामोरे जाणार आहोत."

हेही वाचा -

  1. समाजासाठी छगन भुजबळ सरकारची साथ सोडणार? पंतप्रधानांकडं केली महत्त्वाची मागणी - Chhagan Bhujbal
  2. मराठा आरक्षणावर सरकारनं बोलावली कॅबिनेट बैठक, तोडगा निघणार? - Maratha Reservation Issue
  3. सगेसोयरे शब्दाचा जीआर काढणाऱ्या आमदारांना पाडा - प्रकाश शेंडगे - Maharashtra politics

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.