ETV Bharat / politics

शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; ...म्हणून मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय, माजी मंत्री बबन घोलप यांचा निर्णय - LOK SABHA ELECTION 2024 - LOK SABHA ELECTION 2024

LOK SABHA ELECTION 2024 : ठाकरे गटाचे नाशिकचे माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातय.

Baban Gholap
माजी मंत्री बबन घोलप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 4:07 PM IST

माहिती देताना माजी मंत्री बबन घोलप

नाशिक LOK SABHA ELECTION 2024 : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने माझ्यावर अन्याय केलाय. मला नगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आलं. मला उमेदवारीचा शब्द दिला होता तीही दुसऱ्याला दिली. मी न्याय मागण्यासाठी विनंती केली. परंतु त्याचा फायदा झाला नाही. अखेर मी उद्धव ठाकरे सेनेचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितलं.

उपनेते पदाचा दिला राजीनामा : गेल्या तीन महिन्यापासून ठाकरे गटासोबत न राहण्याचा निर्णय घेणाऱ्या माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. आज संध्याकाळी पाच वाजता मुबंई येथे हा पक्ष प्रवेश होणार आहे. शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीमुळं बबन घोलप हे ठाकरे गटात नाराज झाले होते. त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर करून सेना नेत्यांवर सडकून आरोप केले होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी पक्ष प्रमुख यांना आपल्या उपनेते पदाचा राजीनामा देत फक्त शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेवटी घोलप यांचा आज शिंदे गटात पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.

कोण आहेत बबन घोलप : बबन घोलप हे देवळाली विधानसभा मतदार संघातून तब्बल पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले. तर राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांची कन्या नयन घोलप-वालझाडे यांना सेनेनी नाशिकच्या महापौरपदी विराजमान केलं होतं. तर मुलगा योगेश घोलप यांना एकदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी ठाकरे यांनी दिली होती. बबन घोलप यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं जुन्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घोलप यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवाराच्या मतांवर परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

हेही वाचा -

  1. भाजपावर आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात - राधाकृष्ण विखे पाटील - Radhakrishna Vikhe Patil
  2. नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावं लागेल : विनायक राऊत - Lok Sabha Election 2024
  3. विदर्भाच्या रखरखत्या उन्हात तापणार राजकीय वातावरण; दिग्गज नेते करणार आपापल्या उमेदवाराचा प्रचार - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.