ETV Bharat / politics

काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' ; 'या' नेत्याची तब्बल 20 वर्षांनंतर घरवापसी - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 11:50 AM IST

Sanjay Nirupam Will Join Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केलाय. तसंच तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी करणार असल्यानं त्यांनी आनंदही व्यक्त केलाय.

Sanjay Nirupam will join the Shivsena Shinde Group On 3rd may
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; 'या' नेत्याची तब्बल 20 वर्षांनंतर घरवापसी

मुंबई Sanjay Nirupam Will Join Shivsena : काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम यांनी बुधवारी (1 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील बाळासाहेब भवन येथे बुधवारी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना संजय निरुपम यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं.

काय म्हणाले संजय निरुपम? : यावेळी बोलत असताना संजय निरुपम म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पुढं काय करायचं? याविषयी सविस्तर चर्चा झाली. शुक्रवारी (3 मे) दुपारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचं नियोजन आम्ही केलंय. या प्रवेशासंदर्भातील बाकी सविस्तर माहिती पक्षाकडून देण्यात येईल." तसंच पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षातील सर्व लोकसभा उमेदवारांसाठी प्रचार करणार आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचंही निरुपम यांनी यावेळी सांगितलं.

निवडणूक लढणार? : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संजय निरुपम इच्छुक होते. त्यामुळं आता निवडणूक लढणार का? असा सवाल करण्यात आला असता ते म्हणाले की, "आता कुठं निवडणूक लढणार? नेहमी आपल्या इच्छेप्रमाणं गोष्टी घडत नाहीत. कभी किसी को मुक्कमल जहाँ नही मिलता", असं निरुपम म्हणाले.

काँग्रेसमधून निलंबन : संजय निरुपम यांना काँग्रेसकडून मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ही जागा ठाकरे गटाला मिळाली. त्यामुळं ते नाराज होते. उद्धव ठाकरे यांनी या जागेवरुन अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप केले. यानंतर संजय निरुपम यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर संजय निरुपम भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या, पण भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय निरुपम यांना भाजपामध्ये घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती.

हेही वाचा -

  1. संजय निरुपम लोकसभा निवडणुकीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत; चैत्र नवरात्रीला करणार पुढील राजकीय प्रवासाची घोषणा - Lok Sabha Election 2024
  2. संजय निरुपम यांचा सुपारी घेऊन शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव, आनंद दुबे यांचा आरोप - Amol Kirtikar Khichdi Scam
  3. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.