ETV Bharat / politics

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सहा मंत्र्यांकडे 'ही' खाती येण्याची शक्यता - Expected Portfolio for Maharashtra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 3:39 PM IST

Updated : Jun 10, 2024, 4:35 PM IST

Expected Portfolio for Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राज्यातील सहा जणांचा समावेश असून आता त्यांना कोणती खाती मिळणार याची उत्सुकता लागलीय.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat MH Desk)

मुंबई Expected Portfolio for Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केलं. 72 मंत्र्यांच्या या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश आहे. यात भारतीय जनता पक्षाचे चार, शिवसेनेचा एक तर रिपाईं (आठवले गट) एक मंत्री आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला यंदा कोणती खाती येणार याबाबत चर्चा सुरू असून महाराष्ट्राचं महत्त्व अबाधित ठेवण्याचा यातून प्रयत्न होईल, असं म्हटलं जातं.

राज्याच्या वाट्याला महत्त्वाची पदं : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा रविवारी शपथ घेतली. यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या 72 जणांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे. तर नेहमीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवले यांचा समावेश आहे. तसंच शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनाही संधी देण्यात आली आहे. या मंत्र्यांना दिली जाणारी खाती हा उत्सुकतेचा विषय असून या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, "महाराष्ट्रातील यंदा युतीच्या जागांची संख्या कमी झालीय. त्या तुलनेत महाराष्ट्राला दिलेली मंत्रिपदं ही महत्त्वाची आहेत. केवळ 9 खासदार जिंकूनसुद्धा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं देण्यात आली आहेत. मात्र शिवसेना आणि रिपाईं पक्षाची नेहमीप्रमाणे राज्यमंत्रिपदावर बोळवण केली असून, यावेळी या दोन्ही पक्षांचा सन्मान होईल अशी शक्यता असताना पुन्हा एकदा भाजपानं या पक्षांना मंत्रिमंडळात दडपण्याचा प्रयत्न केला आहे."

महाराष्ट्रातील या मंत्र्यांचा समावेश :

नितीन गडकरी : नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून गेली दोन टर्म काम करत आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते वाहतूक या दोन खात्यांच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांना चौथ्या क्रमांकाचं मंत्रीपद देण्यात आलं असून त्यांना खातंही त्याच तोलामोलाचं देण्यात येईल. त्यांची इच्छा आणि कार्यशाही पाहता पुन्हा एकदा त्यांच्याकडं रस्ते वाहतूक विभागाचाच पदभार सोपवण्यात येईल अशी शक्यता जोशी यांनी व्यक्त केलीय.

पियुष गोयल : उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार पियुष गोयल यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. पियुष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. यापूर्वी पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाचा पदभार सांभाळलाय. यावेळी त्यांच्याकडे वाणिज्य मंत्री अथवा वस्त्रोद्योग मंत्रालय किंवा पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे.

रक्षा खडसे : भाजपाचे माजी नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागलीय. केंद्रिय नेतृत्वाचा खेळीचा हा एक भाग सांगितला जात असून आता महिला आणि बालविकास राज्यमंत्री पदाची जबाबदारी रक्षा खडसे यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

मुरलीधर मोहोळ : पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. पुणे लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील पवारांचं वर्चस्व कमी करण्यासाठी मोहोळ यांना ताकद देण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातय. कुस्तीगीर असलेल्या मोहोळ यांच्याकडं क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

प्रतापराव जाधव : प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे खासदार असून ते चौथ्यांदा लोकसभेत गेले आहेत. वास्तविक शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देणं अपेक्षित असताना त्यांच्या वाट्याला केवळ एकच राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) आलंय. यावरुन पक्षात नाराजी असली तरीसुद्धा शिवसेना पक्षाच्या परंपरेनुसार या पक्षाकडे अवजड उद्योग या खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

रामदास आठवले : राज्यात एकही लोकसभेची जागा न लढवता राज्यभरात महायुतीला पाठिंबा दिला आणि प्रचार केल्यामुळं आपल्याला या वेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळेल अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्यांना पुन्हा एकदा राज्यमंत्रिपदावरच समाधान मानावं लागणार आहे. त्यामुळं गेल्या दोन टर्मपासून त्यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचीच धुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे, अशी शक्यता जोशी यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा :

  1. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' शिलेदारांनी घेतली शपथ; जाणून घ्या, राजकीय प्रोफाईल - Narendra Modi Oath Ceremony
  2. मै रक्षा निखील खडसे...! सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया जिल्हा परिषद सदस्य - MoS Raksha Khadse

Last Updated : Jun 10, 2024, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.