ETV Bharat / politics

शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं दिलं नवं चिन्ह; चिन्ह मिळताच शरद पवार गटाची खास पोस्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 6:57 AM IST

NCP Sharadchandra Pawar Symbol : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह बहाल केलंय. आगामी निवडणुका शरद पवार गट याच चिन्हावर लढवणार आहे.

शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं दिलं नव चिन्ह

नवी दिल्ली NCP Sharadchandra Pawar Symbol : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह दिलंय. त्यामुळं आता शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' असं नाव दिलं होतं. त्यानंतर आता चिन्हही बहाल केलंय. शरद पवार गटानं वटवृक्ष हे चिन्ह मागितल्याची माहिती होती. पण निवडणूक आयोगानं त्यांना 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह दिलंय.

चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाची खास पोस्ट : निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह बहाल केल्यानंतर पक्षानं X (पुर्वीचं ट्विटर) वर खास पोस्ट केलीय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की,

"एक तुतारी द्या मज आणुनि

फुंकिन मी जी स्वप्राणाने

भेदुनि टाकिन सगळी गगने

दीर्घ जिच्या त्या किंकाळीने

अशी तुतारी द्या मजलागुनी!"

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीनं दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या साथीनं दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!," असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात : यापुर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत 'तुतारीवाला माणूस' हे शरद पवार गटाच्या पक्षाचे चिन्ह असणार आहे. 'तुतारीवाला माणूस' या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.

हेही वाचा :

  1. शरद पवार गटासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उच्च न्यायालयाची नोटीस
  2. शरद पवार गटानं मागणी केली तर एका आठवड्यात नवं चिन्ह द्या- सर्वोच्च न्यायलयाचे निवडणूक आयोगाला आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.