मुंबई Vidhan Sabha Election 2024 : राज्यात पुढील तीन ते चार महिन्यात आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोर्चेबांधणी आणि रणनीती आखली जात आहे. तर किती जागा लढवायच्या? किती जागावर आपण जिंकून येऊ शकतो? यावर देखील राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाची बैठक वर्षा निवासस्थानी (Varsha Bungalow) घेतली. या बैठकीला पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.
100 जागा लढवणार : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गटाकडून) 100 जागा लढविण्यात येणार आहेत. यावर बैठकीत चर्चा झाली. तसंच महायुतीत शिवसेना पक्षाने 100 जागा लढवाव्यात यावर देखील पक्षातील नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. या 100 जागांसाठी 100 निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. याचबरोबर प्रभारींची देखील नियुक्ती करण्यात यावी. निरीक्षक आणि प्रभारी यांनी शंभर जागावर विशेष लक्ष द्यावं, असं आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत नेत्यांना दिल्याचं समजतं.
बैठकीत काय झाले : विधानसभा निवडणूक ही पक्षासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे. हीच यशाची टक्केवारी विधानसभेतसुद्धा कायम ठेवायची आहे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिले. निरीक्षक आणि प्रभारी यांना नेमून दिलेल्या एकाच विधानसभा मतदारसंघासाठीच काम करतील. ते एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करतील आणि त्याच ठिकाणी तयारी करतील. याव्यतिरिक्त सरकारने ज्या योजना आणल्या आहेत, त्या मतदारसंघातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. सदस्य नोंदणीवर भर द्या, संघटना वाढवा, लोकांची कामे करा, शिवसेना युवासेना, महिला आघाडीतील पदांची नेमणूक करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.
हेही वाचा -
- अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचं राजकीय भाषण, महामंडळाच्या स्थापनेची घोषणा - Eknath Shinde
- "विरोधकांना समाज नाही तर निवडणुका महत्वाच्या...", देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाच्या बैठकीवरून विरोधकांवर हल्लाबोल
- 1500 रुपयात मुख्यमंत्र्यांचं घर चालंल का? लाडका भाऊ योजनेवरुन विरोधकांचा हल्लाबोल - Ladka Bhau Yojana