ETV Bharat / politics

कोल्हापूर जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला कायम, वारसदारांसाठी नेते आग्रही - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS

जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी, इचलकरंजी, कागल, चंदगड, हातकणंगले या विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा वारसा पुढे चालवण्यासाठी उमेदवारी निश्चित होतील असंच दिसतय.

Kolhapur Assembly Constituency
कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2024, 5:05 PM IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळं राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी पहायला मिळत आहेत. राज्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात संभाव्य उमेदवार जरी ठरले असले तरी, जिल्ह्यातील 10 पैकी 8 विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला कायम राहणार आहे. जिल्ह्यातील अनेक नेते वारसदारांसाठी आग्रही असल्याचं दिसून येत असलं तरी, जनतेच्या दरबारात कोण 'वारस' ठरतो याकडं आता अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

कोल्हापूरचे छत्रपती घराणं : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. मात्र, कोल्हापूरचं राजघराणं असलेल्या छत्रपती घराण्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे छत्रपती या दोन नावांची चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी छत्रपती शाहू यांना लोकसभेत पाठवलं. आता विधानसभेलाही राजघराण्यातील दोन सदस्यांची चर्चा सुरू आहे. तसंच स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे हे सुद्धा राज्याच्या राजकारणाचं मुख्य केंद्र बनले आहेत. यामुळं एकाच घरात राजकारणातील सर्व पदे नको असा एक मतप्रवाह सध्या कोल्हापुरात निर्माण झालाय. आता राजघराण्यातून कोल्हापूर उत्तरच्या मैदानात कोण उडी घेणार याबाबतही संभ्रमावस्था कायम आहे.

कोल्हापुरातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील घराणं : कोल्हापुरातील डॉ. डी. वाय पाटील घराणं राज्याच्या राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखलं जातं. डी. वाय पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जातात. 1957 साली कोल्हापूर नगरपरिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकारणाचा श्री गणेशा झाला. यानंतर 1967 आणि 1972 यावर्षी तत्कालीन पन्हाळा-गगनबावडा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. पुढच्या काळात त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणूनही पाटील यांनी कार्यभार सांभाळला. पुढे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील तत्कालीन करवीर आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. सध्या आमदार सतेज पाटील विधानपरिषद सदस्य आहे. पाटील घराण्याची तिसरी पिढी आमदार ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणचे प्रतिनिधित्व करत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दक्षिणमधून ऋतुराज पाटीलच विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत.

जिल्ह्यात महाडिक घराण्याचीही निर्विवाद सत्ता : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून आपल्या राजकारणाची घडी घट्ट बसवणारे जिल्ह्यातील नेते म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची जिल्ह्याला ओळख आहे. कोल्हापुरातील मातब्बर असलेल्या महाडिक घराण्याच्या राजकारणाची सुरुवात महादेवराव महाडिक यांच्यापासूनच झाली. कोल्हापूर महापालिकेवर एक हाती सत्ता राखून ठेवण्यात महाडिक यशस्वी झाले आणि यावरच त्यांनी जिल्ह्याचंं राजकारण केलं. कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूधसंघ, राजाराम सहकारी साखर कारखाना यासह जिल्ह्यातील अनेक सहकाराची सत्ताकेंद्र महाडिक यांच्याकडं राहिले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा राजकीय वारसा त्यांचे पुतणे आणि सध्याचे भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी पुढे नेला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक लोकसभेवर निवडून गेले. तर याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचे सुपुत्र अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून विधानसभेत एन्ट्री केली. तर शौमिका महाडिक यांनी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषविलं आहे. सध्या महाडिक यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. कोल्हापूर उत्तरच्या जागेवर खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध युट्यूबर कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झालीय.

कागलच्या मंडलिक आणि घाटगे घराण्याची जिल्ह्यावर सत्ता : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात गटातटाच्या राजकारणाला मोठं महत्त्व आहे. 1972 वर्षी अवघ्या 1624 मतांनी विजयी झालेले अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकारणाचा खरा पाया कागलमध्ये घातला गेला. यानंतर त्यांनी कागल विधानसभेचं तब्बल चार वेळा प्रतिनिधित्व केलं. यानंतर 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. सलग तीनवेळा कोल्हापूरचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांनी 2014 मध्ये प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करत लोकसभा लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर 2019 मध्ये संजय मंडलिक शिवसेनेकडून विजयी झाले. आता मंडलिकांची तिसरी पिढी वीरेंद्र मंडलिक यांच्या रूपाने कागलच्या राजकारणात सक्रिय होत आहे.

कागलच्या घाटगे घराण्याचा "वारसा" : राजर्षी शाहू महाराजांच्या मूळ घराण्याचे वारसदार असलेले, कागलच्या शाहू कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह घाटगे यांनी 1978 च्या विधानसभा निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी सदाशिवराव मंडलिक यांचा 11 हजार 434 मतांनी पराभव करत विधानसभा गाठली होती. यानंतर 1980 वर्षी झालेल्या निवडणुकीतही मंडलिकांचा पराभव करण्यात घाटगे यशस्वी झाले होते. यानंतर मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक आणि घाडगे यांचा पराभव केला. विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजीत घाटगे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कागलच्या आखाड्यात दुसऱ्यांदा उतरले आहेत. त्यांच्यासमोर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचं आव्हान असणार आहे.

गडहिंग्लज-चंदगडचं कुपेकर घराणं : 1995 वर्षी झालेला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बाबासाहेब कुपेकर पहिल्यांदा विधानसभेवर गडहिंग्लज मतदार संघातून निवडून गेले. त्यानंतर सलग 5 वेळ त्यांनी कुपेकर यांनी गडहिंग्लज विधानसभेच प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या निधनानंतर कन्या नंदाताई बाभुळकर सध्याच्या चंदगड विधानसभेतून तयारी करत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर भारतीय जनता पार्टीतून इच्छुक आहेत.

इचलकरंजीत आघाडी कुटुंबीयांनी 4 दशक केलं प्रतिनिधित्व : एकेकाळी काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून तत्कालीन इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून तब्बल 5 वेळा निवडून गेले. सहकारी साखर कारखानदारी, सूतगिरण्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जाळे भक्कम करून आवाडे कुटुंबीयांनी या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले. पुढे कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे सुपुत्र प्रकाश आवाडे यांनी 1985, 1990, 1995, 1999, 2004 च्या विधानसभेत निवडून आले. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सुरेश हाळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांचा विजयी रथ रोखला. पुन्हा गत विधानसभेत आवाडे यांनी अपक्ष बाजी मारून या मतदारसंघावर पुन्हा पकड निर्माण केली. नुकताच आवाडे कुटुंबीयातील सदस्यांनी भाजपा प्रवेश करून यंदाच्या विधानसभेसाठी प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आवडे कुटुंबीयातील तिसरी पिढी विधानसभेसाठी सज्ज झाली आहे.

शाहूवाडीत पाटील कुटुंबियांची मतदारसंघावर पकड : 1980 च्या विधानसभा निवडणुकीत शाहूवाडीमधून बाबासाहेब पाटील सरूडकर 33 हजारांच्या मताधिक्याने पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. 1990 विधानसभेतही दुसऱ्यांदा बाबासाहेब पाटील यांनी या मतदारसंघात निवडून येऊन एक हाती वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यांच्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचे सुपुत्र सत्यजित पाटील सरूडकर पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यानंतरच्या सलग 3 निवडणूक सत्यजित पाटील यांनी विजय मिळवला. 2019 मध्ये मात्र जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी त्यांचा पराभव केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कडवी झुंज देत सत्यजित पाटील सर्वकार यांनी अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं. आता विधानसभेच्या निवडणुकीतही विनय कोरे यांच्या विरोधात सत्यजित पाटील विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असणार आहेत.

करवीर विधानसभेत काँग्रेस निष्ठावंत पाटील कुटुंब : तत्कालीन सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख राज्यभर निर्माण केलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी पक्षावरील निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा जाळ निर्माण केलं. पुनर्रचनेआधी सांगरूळ आणि आता करवीर विधानसभा मतदारसंघात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य होतं. मात्र, 2004 विधानसभा निवडणुकीत 44 हजार मतांनी काँग्रेसकडून पी. एन. पाटील यांनी पहिला विजय मिळवला. यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत ही पी. एन. पाटील काँग्रेसकडून विजयी झाले. नुकतंच त्यांचं निधन झालं यानंतर आता त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील करवीर विधानसभेतून नशीब आजमावणार आहेत.

चंदगड विधानसभेत पाटील पिता-पुत्रांनी गाजवली विधानसभा : अत्यंत दुर्गम अशी चंदगड विधानसभेची ओळख आहे. याच मतदारसंघातून 1990 च्या विधानसभेत नरसिंह गुरुनाथ पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. यानंतर चंदगड तालुक्यावर नरसिंह पाटील यांनी वर्चस्व निर्माण करत सलग दोनवेळा या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. यानंतर त्यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी गत विधानसभेत कायम ठेवत राष्ट्रवादीकडून विजय मिळवला. यंदाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून चंदगडसाठी ते प्रबळ दावेदार आहेत.

हातकणंगलेत आवळे कुटुंब यंदाही विधानसभेच्या रिंगणात : जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ म्हणून सध्याचा हातकणंगले आणि पूर्वीचा वडगाव मतदारसंघ ओळखला जातो. सलग 5 वेळा वडगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले जयवंतराव आवळे यांनी केलं. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू किसनराव आवळे यांनी जयवंतराव आवळे यांची विजयी घोडदौड रोखली. 2019 च्या विधानससभेत जयवंतराव आवळे यांचे सुपुत्र राजू बाबा आवळे यांनी काँग्रेसकडून विजय मिळवत, यंदाही काँग्रेसकडून या मतदारसंघात प्रमुख दावेदार असणार आहेत.

वारसदारांनाच पुन्हा संधी मिळणार का? : जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी, इचलकरंजी, कागल, चंदगड, हातकणंगले या विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला यंदाच्या निवडणुकीत ही कायम राहणार आहे. यामुळं अनेक विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध वारसदार असा संघर्ष ही पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक घरांनी सध्या साखर कारखानदारी, सुत गिरण्या, स्थानिक स्वराज्य संस्था, दूधसंघ, शेती उत्पन्न, बाजार समिती या संस्थांवर वर्चस्व राखून आहेत. आता जनतेच्या दरबारात वारसदारांनाच पुन्हा संधी मिळणार का? हे पाहणं लक्षवेधी असणार आहे.

हेही वाचा -

  1. शरद पवारांकडं अनेकांची घरवापसी, ठाकरेंची दारं अद्याप बंदच; हे ठाकरेंचं यश की अपयश?
  2. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 1962 ते 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा, शिवसेनेच्या विजयाचा रंजक इतिहास
  3. शरद पवारांनी दाऊदला भेटल्याचा खुलासा करावा, ॲड. प्रकाश आंबेडकरांचं आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.