ETV Bharat / politics

"उद्धव ठाकरेंनी अदानींकडून चंदा घेतला की नाही? हिम्मत असेल तर...." - Dharavi Redevelopment Project

Dharavi Redevelopment Project : मुंबईतील धारावी पुनर्वसन प्रकल्प सध्या चर्चेत आहे. अदानी ग्रुप या प्रकल्पावर काम करत आहे. त्यामुळं या विषयावरुन राजकीय आरोप सुरू आहेत. मुंबई अदानींच्या घशात घातली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

Uddhav Thackeray and Dharavi Rehabilitation Project
उद्धव ठाकरे आणि धारावी पुनर्वसन प्रकल्प (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 7:47 PM IST

मुंबई Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्वसन प्रकल्पावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सध्या जोरदार 'वाकयुद्ध' रंगलं आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ पैसे उकळण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे वळवळ करत आहेत," असा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला.

प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम (ETV BHARAT Reporter)

निरुपम यांचं ठाकरेंना आव्हान : "धारावी प्रकल्पातील झोपडपट्टीवासियांची कुठलीही तळमळ अथवा कणव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाही. तर केवळ अदानी यांच्याकडून निवडणुकीपूर्वी पैसे उकळण्यासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध केला जात आहे," असा गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. "हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन जाहीर करावं की, त्यांनी निधी घेतला नाही," असं आव्हान निरुपम यांनी केलं.

अदानींना कोणामुळं टेंडर मिळालं? : "2019 मध्ये सुरुवातीला महायुतीचं सरकार असताना धारावी पुनर्वसन संदर्भात अदानींऐवजी दुसऱया एका कंपनीला टेंडर मिळालं होतं. मात्र, 2020 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं हे टेंडरच रद्द केलं आणि अदानींना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी कुणाच्या दबावाखाली ठाकरे यांनी हा निर्णय घेतला? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अदानींचे काय संबंध आहेत? हे सर्वांना माहिती आहे," असं म्हणत या सर्व प्रकरणाला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच जबाबदार असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगावं की, त्यांना अदानी यांच्याकडून आतापर्यंत काहीही निधी आला नाही आणि आता ते भविष्यातही अदानी यांच्याकडून निधी घेणार नाहीत, हिम्मत असेल तर त्यांनी जाहीर शपथ घ्यावी. - संजय निरुपम, प्रवक्ते, शिवसेना

निवडणुकीसाठी खटाटोप : "धारावी झोपडपट्टीतल्या नागरिकांच्या भल्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पात्र आणि अपात्र लोकांना सरसकट घरे देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळं पोटशूळ उठलेल्या उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर 2023 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा जुलै महिन्यात त्यांनी हा विषय उचलून धरला आहे. गेले सहा महिने ते का गप्प होते? गेल्या सहा महिन्यात उद्धव ठाकरे यांना अदानींकडून किती निधी आला?" असा सवाल निरुपम यांनी केला.

हेही वाचा -

  1. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षात 'शिंदेशाही', शिवसेना ठाकरे पक्षानं कशामुळे केले गंभीर आरोप? - Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
  2. अमित शाहांची शरद पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “हे ऐकून मला हसू…” - Supriya Sule
  3. कसाबला तुरुंगात खरंच बिर्याणी देण्यात आली होती का? अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा मुंबईवरील दहशतवादी हल्ला चर्चेत! विरोधक म्हणाले.... - Ajamal Kasab Biryani Controversy

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.