ETV Bharat / politics

कराड उत्तरची भाकरी फिरवा, २५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी

कराड उत्तरमधील भाजपा उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते खंडोबांचं दर्शन घेवून झाला.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

सातारा : शरद पवार नेहमी सांगत असतात की, भाकरी फिरवली पाहिजे. त्याप्रमाणं उत्तर कराडमध्ये आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तुम्ही भाकरी फिरवा, मी २५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो, अशी हमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना दिली. तर प्रचाराच्या शुभारंभावेळी त्यांनी खंडोबांचं दर्शन घेत येळकोट..येळकोट..जय मल्हारचा जयघोष केला.

जनतेच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झालो : कराड उत्तरमधील भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचार सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, "आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आणि टेंभू, म्हैसाळसारख्या योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. आमदार नसताना कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडेंनी ९९० कोटी रुपयांचा निधी आणला. आपले आशीर्वाद मिळाले तर २५ वर्षाचा बॅकलॉग भरुन काढू.

कल्याणकारी योजना सुरूच राहतील : महायुती सरकारने अंमलात आणलेल्या 'लेक लाडकी योजना', 'मुख्यमंत्री लाडकी बहीण', 'एसटी प्रवासात सवलत', मुलींना मोफत उच्चशिक्षण या सर्व योजना भविष्यातही सुरू राहतील, असं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. महायुतीच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद दिला तर कराड उत्तरला मागे वळून बघावं लागणार नाही. आपल्या विकासाची हमी आम्ही घेतो, असा शब्दही फडणवीसांनी दिला.

विरोधकांची व्यक्तीद्वेषातून फडणवीसांवर टीका : महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याची प्रगती सुरू आहे. या सरकारच्या काळात चांगल्या योजना राबवल्या गेल्या आहेत. काही लोक फक्त नाकर्तेपणा लपवण्यासाठी फडणवीसांवर चिखलफेक आणि व्यक्तिद्वेषातून टीका करत असल्याचा आरोपही उदयनराजेंनी केला.

हेही वाचा -

  1. सरकार आल्यास सर्वच महिलांना राज्यात मोफत प्रवासाची राहुल गांधींची घोषणा; मुंबईत महाविकास आघाडीची जंगी सभा
  2. "आहे आनंदाची दिवाळी, आता वेळ आहे महायुतीच्या सत्तेची पाळी", चारोळीतून आठवलेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
  3. "20 तारखेला बकरीला कापू," सुनील राऊतांचं वादग्रस्त विधान; आक्षेपार्ह विधानांमुळे विरोधक वारंवार अडचणीत, नेमकी कारणं काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.