ETV Bharat / politics

२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचंच असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी दिला. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

Devendra Fadnavis Reaction On NCP
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 9:05 AM IST

Updated : Feb 7, 2024, 11:03 AM IST

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर Devendra Fadnavis On NCP : निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखेर अजित पवार यांच्या गटाला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या संदर्भात मंगळवारी निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाला मिळेल हा निर्णय अपेक्षित होता. गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने या पद्धतीनेच भूमिका घेतली आहे. अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर पाच प्रकरणात घेतलेली भूमिका अशीच आहे. बहुमताने घेतलेला निर्णय हा लोकशाहीत महत्त्वाचा असतो."

पक्षाचे जे संविधान आहे, त्याचं किती पालन करण्यात आलं खूप महत्त्वाचं असतं. सगळ्या गोष्टींचा उहापोहा नंतरचं निर्णय करण्यात आला आहे. त्यामुळं मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. अपेक्षा आहे त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात उत्तम काम करेल - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अनेक गोष्टींचा उहापोह केल्यानंतर निर्णय : "बहुमताला महत्त्व आहे, पण केवळ बहुमताच्या आधारावर हा निर्णय झालेला नाही. सगळ्याचं गोष्टींचा विचार झालेला आहे. पार्टीच संविधान काय होतं. त्याचं किती पालन करण्यात आलं. निवडणुका झाल्या की नाही. पक्ष कोणाचा आहे अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यामध्ये झालेला आहे."

लोकशाहीने त्यांना जागा दाखवली : "2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, त्यांना आज लोकशाही काय असते ते समजलं असेल. आज लोकशाहीबद्दल ओरडत आहेत. त्यांनी लोकशाहीचा मुडदा पडला होता. लोकशाहीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली."

हेही वाचा -

  1. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला, निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला चिन्हासह मिळालं पक्षाचं नाव
  2. पुतण्यानं केलं काकाला चितपट;राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून अजि पवारांच्या बंडखोरीपर्यंत राष्ट्रवादीचा 'असा' राहिला प्रवास
  3. राष्ट्रवादी अजित पवारांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय आहेत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया?

Last Updated : Feb 7, 2024, 11:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.