ETV Bharat / politics

अमित शाहांचा मुंबई दौरा संपताच अजित पवार मध्यरात्री 'वर्षा'वर; तीन तास चर्चा - DCM Ajit Pawar Meet CM

DCM Ajit Pawar Meet CM Eknath Shinde : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना याचा फायदा गणेशोत्सवामध्ये कसा करुन घेता येईल याकडं सर्व राजकारण्यांचं लक्ष लागलं आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं भेट दिली.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2024, 9:58 AM IST

मुंबई DCM Ajit Pawar Meet CM Eknath Shinde : एकीकडं सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना दुसरीकडं गणेशोत्सवाच्या निमित्तानं राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल त्याच्यासोबत मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्यात बरीच राजकीय खलबत्त रंगली. रात्री उशिरा जवळपास तीन तास ही चर्चा रंगली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांनी उमेदवार घोषित केल्यानं नाराजी : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना याचा फायदा गणेशोत्सवामध्ये कसा करुन घेता येईल याकडं सर्व राजकारण्यांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यापासून पळ काढणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत खासदार प्रफुल पटेल, मंत्री उदय सामंत, दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागावाटप संदर्भामध्ये या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात दिलेल्या आदेशाप्रमाणे जिंकून येणाऱ्या जागेला प्राधान्यानं मंजुरी देण्यात येणार आहे. तसंच जागा वाटपासोबत उमेदवारही लवकरात लवकर घोषित करण्याचे प्रयत्न असणार आहेत. विशेष म्हणजे जागा वाटपात कुठंही मतभेद होणार नाहीत. तसंच सामंजस्यपणानं जागा वाटपाचा तिढा कसा सोडवता येईल याबाबत ही चर्चा झाली. अजित पवारांनी आतापासूनच काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करणं सुरु केल्यानं त्यावरुन महायुतीत वाद निर्माण झाला आहे. यामुळं शिवसेना शिंदे गट, भाजपा तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राज्यभरात समोरासमोर लढणाऱ्या जागांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात राबवा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार महायुतीमधून राज्यभर केला जात असताना अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री या शब्दाला बगल दिली जात आहे. त्याबाबत शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यासोबत निवडणुकीला सामोरं जाताना कुठल्याही प्रकारचे मतभेद महायुतीत असता कामा नये, एकमेकांना सांभाळून पुढं जायचं आहे, यावरही शिक्कामोर्तब झालं. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मुख्यमंत्री हे स्वतः बहिणींची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेत आहेत, हे फार कौतुकास्पद आहे." तसंच जेव्हा आम्ही ही योजना आणली तेव्हा काहीजण कोर्टात गेले, असा टोलाही उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.

हेही वाचा :

  1. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही? सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर - Maratha Reservation
  2. धक्कादायक! प्रियकरानं प्रेयसीची हत्या करून मृतदेह ठेवला रिक्षात, पिंपरीत खळबळ - Pimpri Chinchwad Crime

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.