ETV Bharat / politics

"संसदेच्या अधिवेशन काळात एनडीए 300..."; अजित पवारांना विश्वास - Ajit Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 10:31 PM IST

DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी वर्धापन दिनानिमित्त 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवार यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतांना भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची कसर भरुन काढली जाईल अशा प्रकारचा निर्धार आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात करण्यात आला.

अजित पवार
अजित पवार (Etv Bharat Reporter)

मुंबई DCM Ajit Pawar : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील अपेक्षित असं यश मिळालं नसल्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची कसर भरुन काढली जाईल अशा प्रकारचा निर्धार आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी वर्धापन दिनानिमित्त 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवार यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतांना भावनिक झाल्याचं पाहायला मिळाल्यानं अजित पवारांनी काही संकेत दिले का यावर चर्चा सुरु झालीय.

काय म्हणाले अजित पवार : शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अजित पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं तसंच बोलताना गहिवरलेले दिसले. यावेळी अजित पवार म्हणाले, "निवडणूक काळात मी म्हणालो होतो की, काय निकाल लागेल का ब्रम्हादेवाला माहित. निवडणूक निकालाबाबत अंदाज चुकले. काँग्रेस पक्षात त्रास झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. काळ वेळ कोणासाठी थांबत नसतो. पक्ष उभारणीसाठी अनेक आमदारांनी कष्ट सहन केले.आपण प्रयत्न केला. वेगवेगळ्या बातम्या सुरु होत्या, कारण नसताना गैरसमज पसरवले जात होते. काल आम्ही सर्वजण दिल्लीत होतो.आमच्या पक्षात कुठलाही मतभेद नव्हते. बोललो तरी, नाही बोललो तरी बातम्या चालवण्यात आल्या आम्हला स्वतंत्र कारभार आणि राज्यमंत्री पद द्यायची तयारी दर्शवली होती. मात्र, प्रफुल पटेल यांनी कॅबिनेट मंत्री पदाचा कारभार चालविला असल्यानं आम्ही आपल्या सोबतच आहोत. मात्र, कोणतंही मंत्रिपद स्वीकारलं नाही. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला." तसंच जुलै महिन्याच्या शेवटी राज्यसभेत आपले 3 सदस्य पाहायला मिळेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही स्वराज्याची राजधानी रायगडची जागा आपण जिकल्याचा आनंद आहे. एनडीए सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. संसदेच्या आधिवेशनाच्या काळात एनडीए 300 पर्यंत मजला मारणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय.

नवीन रक्तांना वाव देणार : पुढं बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीचा विचार जर केला तर 43.90 टक्के मत महाविकास आघाडीला मिळाले तर महायुतीला 43.30 टक्के मत महायुतीला पडलं म्हणजेच अर्धा टक्क्याचा फरक पडला. लोकसभा निवडणुकीवर आरक्षणाचा फटका देखील बसलाय. काही भागात आरक्षणासंदर्भात कसं भाषण झाले हे पाहिले आहे.आपण चिंता करु नका. सोशल मीडियात आपला पक्ष कमी पडलाय. कांद्यानं अक्षरशः रडवलं, कांदामुळं जळगाव, उत्तर महाराष्ट्र मधील जागा पडल्या. पक्ष विस्तार सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. भक्कम पाया असेल तर पक्ष भक्कम उभा राहील. नवीन रक्ताला वाव दिली जाईल. मंत्री आणि नेत्यांना जबादारी स्वीकारुन कामाला लागा नव्या दमानं आणि जोमानं विधानसभासाठी कामाला लागू या, विजय पताका तुम्ही लावाल अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांना कानपिचक्या : यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या देखील दिल्या आहेत. कामाला लागत असताना आपल्या पक्षासोबत असलेल्या महायुतीतील घटक पक्षात आपल्या बोलण्यानं आपल्या वागण्यानं आपल्या कृतीनं अंतर पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आदिवासी भागात देखील मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलाय. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि भविष्यात देखील राहील यात कुणीही शंका घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाचा आणि राज्याचा विकासाचा विचार करुन एनडीए पक्षात सामील झालाय. देशाचा आणि राज्याचा विकास जरी महत्त्वाचा असला तरी शिव शाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे. तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील आत्मा आहे. आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. तशाच प्रकारे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा आपला पक्ष सोडणार नाही. या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे नरेटीव्ह सेट केले होते. त्यामुळं आपल्या सोबतच्या मंत्री सहकार्यांनी जनतेपुढं सत्यता मांडली पाहिजे असं देखील आवाहन त्यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर; देशाला मिळाले नवे कृषिमंत्री, महाराष्ट्राच्या वाट्याला 'ही' महत्त्वाची खाती - Modi Cabinet Portfolio
  2. राज्यातील मंत्र्यांना केंद्रात 'वजन'; गडकरी पुन्हा 'रोडकरी', रक्षा खडसे करणार 'युवकांचं कल्याण' तर मोहोळांना भारदस्त खातं - Maharashtra Ministers Portfolio

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.