ETV Bharat / politics

"काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि हात..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैजापूर येथे प्रचारासाठी आले होते.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2024, 10:05 PM IST

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभेला जोरदार सुरुवात झाली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रमेश बोरनारे यांच्या प्रचारासाठी वैजापुरात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

घर पेटवणारी मशाल आहे : "मी घेणारा नाही तर देणारा मुख्यमंत्री आहे. तुमच्या अडीच वर्षात तुम्ही काय दिलं ते पाहा आणि दोन वर्षात आम्ही काय दिलं ते लक्षात येईल. त्यांना (उद्धव ठाकरे) मिळालेलं चिन्ह लोक म्हणतात क्रांतीची मशाल आहे. मात्र, तुमची मशाल घरे पेटवणारी आहे," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. "आमच्या वचननाम्याची चोरी करून तुम्ही जाहीरनामा करत आहात, कॉपी-पेस्ट करून वचननामा बनवता येत नाही. आमचे सरकार कोणत्या एका समाजाचे नाही तर सर्वांचेच आहे," असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. महायुतीचं सरकार कायम राहणार, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

काँग्रेसची दहशतवाद्यांना साथ : "ज्या काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि काँग्रेसचा हात पाकिस्तानबरोबर आहे, अशा पक्षाबरोबर हे गेले, मांडीला मांडी लावून बसले आहेत. बाळासाहेबांनी यांना उलटं टांगून खाली मिरचीची धुरी दिली असती. उद्धव ठाकरे यांना वाटलं होतं की, आम्ही जिंकू, मात्र उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार विसरलेत तर ते कसे जिंकणार? धनुष्यबाण उचलायला हातामध्ये ताकद लागते. आम्ही मागेही धनुष्यबाणावर लढलो आणि आजही धनुष्यबाणावर लढत आहोत," असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

माझ्यावर कारवाई करण्याची हिम्मत नाही : "'लाडकी बहीण योजना' बंद करायला गेले असता, एका कोर्टाने यांच्या मुस्काटात दिली. दोषी असल्याचं सांगत कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकण्याची तुमच्याकडं हिम्मत आहे का? मला हलक्यात घेऊ नका, तुमचा टांगा पलटी करून आलो. आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असून, ते वेडे झाले आहेत. लाडक्या बहिणीला नाराज केल्यानं आता कडकलक्ष्मी म्हणून तुमचा कार्यक्रम करणार," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

हेही वाचा -

  1. काँग्रेसच्या 16 बंडखोरांची हकालपट्टी; 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित
  2. एकहाती झेंडा रोवणारा मतदारसंघ राखण्याचं भाजपापुढं कडवं आव्हान
  3. "संयम ठेवा! महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.