ETV Bharat / politics

ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमकपणा रोखण्यासाठी 'मोठ्या भावाची' टीम तयार; कोण वरचढ? - Congress Coordination Committee - CONGRESS COORDINATION COMMITTEE

Congress Coordination Committee : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं दहा सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली.

Maha Vikas Aghadi Candidate list
समन्वय समितीसाठी काँग्रेसच्या 10 नेत्यांच्या नावांची घोषणा करताना नाना पटोले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 6:47 PM IST

Updated : Jul 26, 2024, 7:17 PM IST

मुंबई Congress Coordination Committee : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच तारखा जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी एकत्रित लढत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा मागितल्या आहेत. तर दुसरीकडं मीच मोठा भाऊ असल्याचं काँग्रेस सांगत आहे. त्यामुळं सर्वात जास्त जागा मागणाऱया ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमकपणा कमी करण्यासाठीच काँग्रेसनं समन्वय समितीची घोषणा केली.

समन्वय समितीची घोषणा : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीनं आता विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election 2024) कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांत समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाकडून समन्वय समितीसाठी 10 नावांची यादी जाहीर करण्यात आली.

Maha Vikas Aghadi
काँग्रेस पक्षाकडून समन्वय समितीसाठी नावांची यादी (ETV Bharat Reporter)

तिन्ही पक्षात समन्वय : शिवसेना - उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखणे, जागा वाटपाच्या दरम्यान होणाऱ्या अंतर्गत नाराजीला लगाम लावणे, निवडणुकीची रणनीती कशी असणार? जागा वाटपाचा फॉर्म्युला कशाप्रकारे असायला हवा, विधानसभेच्या 288 जागांपैकी जिंकणाऱ्या जागांचे मेरिट ठरवणे, विधानसभेचे उमेदवार ठरवणे या सर्वांसाठी समन्वय समिती नेमली जाणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेसची समिती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत वाटाघाटीसाठी म्हणजेच समन्वय साधण्याच्या हेतूनं काँग्रेस पक्षाकडून समितीत सहभागी होणाऱ्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात अली. काँग्रेसकडून दहा नावं जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के.सी वेणूगोपाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं. या यादीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार सतेज पाटील, नसीम खान यांचा समावेश करण्यात आला आहे. तर मुंबई काँग्रेस विभागातून मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख आणि आमदार भाई जगताप यांना देखील स्थान देण्यात आलं आहे.

विधानसभेची तयारी सुरू : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी समन्वय समिती निर्माण केली होती. त्यासाठी आपापल्या पक्षाकडून दोन, दोन नावे दिली होती. ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बसराव पाटील आणि नसीम खान यांना संधी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीने जागा वाटपात आणि उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली होती. त्याचा फटका महायुतीला बसला होता. त्याच कारणास्तव आता महाविकास आघाडी विधानसभेच्या तयारीला लागली. त्या अनुषंगाने जागा वाटपात आणि उमेदवारी घोषित करण्यातकरिता पावले उचलत आहेत.

विधानसभेकडं नजरा : विधानसभा निवडणूक लढवताना महाविकास आघाडी म्हणून सामोरे जावा आणि जास्तीत जास्त जागा जिंका, अशा प्रकारचा संदेश पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवू, कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एकत्र लढणार आणि एकत्रित 200 जागा जिंकणार आहोत, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. विधानसभेसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी 'ईटीव्ही भारत'च्या हाती; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट - MNS Candidates List
  2. "जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री", वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचे लागले बॅनर - Uddhav Thackeray Banner
  3. "...त्याचवेळी फडणवीसांवर एफआयआर का नाही केला?" चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना सवाल - Chandrashekhar Bawankule

Last Updated : Jul 26, 2024, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.