ETV Bharat / politics

"ओबीसी आंदोलकांचा प्रश्न मुख्यमंत्री...."; मंत्री अतुल सावेंनी स्पष्टच सांगितलं - Minister Atul Save

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 10:13 PM IST

Minister Atul Save : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी समाजाने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर लवकरच तोडगा काढण्यात येईल आणि मुख्यमंत्री याबाबत समाधानकारक निर्णय घेतील, अशी माहिती अतुल सावे यांनी दिली. मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

Minister Atul Save
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री अतुल सावे (File Photo)

मुंबई Minister Atul Save : राज्यात जरांगे पाटील यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडलं आहे तर दुसरीकडं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्यात येऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके आणि अन्य ओबीसी नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देताना मंत्री अतुल सावे (ETV BHARAT Reporter)

मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील : या संदर्भात बोलताना राज्याचे इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यशस्वीरित्या तोडगा दिला होता. त्याचप्रमाणं आता ओबीसी बांधवांच्या आंदोलनाबाबतही मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्यावर तोडगा देतील. मात्र, त्यासाठी समोरासमोर बसून विषय संपवणं गरजेचं आहे. लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्री ओबीसी बांधवांशी चर्चा करतील.

मंत्रिमंडळाचा विस्तार होणार : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. अनेक आमदार गेल्या काही महिन्यांपासून इच्छुक आहेत. त्यांचा निश्चितच समावेश होईल. पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण काहीही बोलणार नाही आपण पक्षाचे प्रवक्ते नाही, यासंदर्भात पक्षाचे प्रवक्तेच बोलतील, असंही त्यांनी सांगितलं.

ही तर काँग्रेसची संस्कृती : तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अतुल सावे म्हणाले की, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. ही काँग्रेसची संस्कृती आहे हे यातून ते दाखवून देत आहेत. कार्यकर्त्यांना अशा पद्धतीची वर्तणूक देणं म्हणजे त्यांना गुलाम समजणं आहे.

हेही वाचा -

  1. राजकीय पक्ष लागले कामाला; विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान, पाहा वेळापत्रक - Vidhan Parishad Election 2024
  2. मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा; विधानसभेतील जागावाटपाची यादी तयार? - Maharashtra Politics
  3. राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? प्रियंका गांधी निवडणूक लढवण्यामागं काँग्रेसची काय आहे रणनीती? - Rahul Gandhi To Push Congress in UP

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.