ETV Bharat / politics

ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी खुशखबर; सरकारकडून कल्याणकारी महामंडळ स्थापन, किती कोटी रुपयांची तरतूद? - Eknath Shinde On Rickshaw Taxi

Eknath Shinde On Rickshaw Taxi : राज्य सरकारनं ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Rickshaw Taxi Drivers) कल्याणकारी मंडळ निर्माण केलंय. लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. टॅक्सी चालकांना ग्रॅच्युएटी देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं.

CM Eknath Shinde On Auto Riksha Taxi
ऑटो रिक्षा-टॅक्सी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 8:37 PM IST

मुंबई Eknath Shinde On Rickshaw Taxi : राज्य सरकारनं ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Rickshaw Taxi Drivers) कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, जे रोज रोजंदारीवर काम करतात अशा गोर-गरिबांसाठी या कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आलीय. तसेच राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट करण्यात येईल. यासाठी जर्मनीसोबत आम्ही रोजगाराबाबत करार केला आहे. यात चार लाख तरुणांना तिथे रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV BHARAT Reporter)

50 हजार रुपयांची तात्काळ मदत : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महामंडळामध्ये ज्याला दुखापत होईल, त्याला तात्काळ 50 हजार रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे. त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी आहे. ती आणखी विस्तृत बनविण्याचा देखील विचार आहे. यामध्ये हे चालक जेव्हा 65 वर्षाचे होऊन निवृत्त होतात. तसेच ते कामकाज करू शकत नाहीत किंवा गाडी चालवू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना पुढचं भविष्य त्यांचं सुखकर होण्यासाठी 'एक ग्रॅज्युएटीची एक पॉलिसी' आम्ही करण्याचा विचार केला आहे. त्यामध्ये देखील त्याचा फायदा होईल. आज परिवहन विभागाने 50 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये केली आहे.

उद्योगाला चालना देणार : या महामंडळात उद्योगाला चालना देण्यात येईल. यात सर्व चालकांचं जे काही मिनिमम असं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सगळ्यामधून हे महामंडळ मोठं ताकदीचे महामंडळ होईल. अनेक योजना या लाखो लोकांच्या परिवारासाठी मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी केल्या जातील. अशा प्रकारचं महत्त्वाचं हे महामंडळ टॅक्सी-ऑटो चालक कल्याणकारी महामंडळ सुरू झालेलं आहे. सर्वांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारमध्ये केलं जातं असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. 'मी त्यांच्यासारखा अल्कोहॉलिक नाही', रवींद्र वायकरांचा ठाकरेंवर निशाणा - Lok Sabha election results
  2. राजकीय पक्ष लागले कामाला; विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान, पाहा वेळापत्रक - Vidhan Parishad Election 2024
  3. राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? प्रियंका गांधी निवडणूक लढवण्यामागं काँग्रेसची काय आहे रणनीती? - Rahul Gandhi To Push Congress in UP

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.