ETV Bharat / politics

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणायची आहे का? जाहिरातीवरुन चित्रा वाघ कडाडल्या - lok sabha Election - LOK SABHA ELECTION

Chitra Wagh : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जाहिरातीवर आक्षेप घेत जाहिरातींमध्ये पॉर्नस्टारचा वापर केल्याचा गंभीर आरोप केल्यानं राजराकण चांगलंच तापलंय.

Chitra Wagh
उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणायची आहे का? ठाकरे गटाच्या जाहिरातीवरुन चित्रा वाघ कडाडल्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 3:32 PM IST

मुंबई Chitra Wagh : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोचलेला असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झाडू लागल्या आहेत. तपतपत्या उन्हात राजकीय तापमानही चांगलं तापलंय. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जाहिरातीवर आक्षेप घेत जाहिरातींमध्ये पॉर्नस्टारचा वापर केल्याचा गंभीर आरोप केलाय. चित्रा वाघ यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे गटाकडूनही चित्रा वाघ यांना त्या पद्धतीनं उत्तर देण्यात आलंय.

काय म्हणाल्या चित्रा वाघ? : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जाहिराती या आदित्य ठाकरे नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आहेत, असा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. या जाहिरातींमध्ये वापरण्यात आलेलं पात्र हे पॉर्नस्टार असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न अशी किळसवाणी संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय. अशा पद्धतीनं महिलांवरचे अत्याचार आता कधी थांबणार? हा जो पॉर्नस्टार आहे, तो लहान मुलीवर अत्याचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. याच व्यक्तीचे घाणेरडे कृत्य करतानाचे अनेक व्हिडिओ आणि क्लिप ॲपवर आहेत. याकरता शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना पब, पार्टी आणि पॉर्न असा प्रकार आणायचा आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय.

दुसरा कोणी सापडला नाही का? : टीव्हीवर प्रसारित झालेल्या या जाहिरातीमधील व्यक्ती हा उल्लू ॲपवर मुलींसोबत घाणेरडे कृत्य करण्याचे क्लिप आहेत. इतकंच नाही तर तोच विचारतो की महाराष्ट्रातील महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आहेत? त्याकरता असले किळसवाणे प्रकार आम्ही महाराष्ट्रामध्ये कधीच घडू देणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी घाणेरडी संस्कृती वाढवण्याचे प्रकार सुरु आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींमुळं महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीची मान ही शरमेनं खाली गेलीय. उद्धव ठाकरे यांना याकरता दुसरा कोणी सापडला नाही का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. जी जाहिरात दाखवण्यात आलीय त्याचा आणि पब, पार्टी व पॉर्न या नाईटलाइफ कल्चरशी काही संबंध आहे का? याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला हवं असून याकरता उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडावी असं आवाहन चित्रा वाघ यांनी दिलंय. तसंच चित्रा वाघ यांनी केंद्र सरकारनं या सर्व ॲपवर बंदी आणण्याची मागणी केलीय.

प्रज्वल रेवना किंवा मुलुंडचे एचडी चे काय? : चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर शिवेसना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिलंय. यात सुषमा अंधारे म्हणाल्या की, आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3 हजारहून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना, किंवा मुलुंडचे व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करुन बसल्या. त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावलाय.

हेही वाचा :

  1. धर्मावर आधारित आरक्षणाचं विधान करून समाजातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न-शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका - Sharad Pawar
  2. उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भेटीत नेमकं काय घडलं? - Ujjwal Nikam Meet Raj Thackeray

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.