ETV Bharat / politics

'त्याला' सोडायचं नाही; मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना डिवचलं - Chhagan Bhujbal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 7:51 AM IST

Chhagan Bhujbal On Jarange Patil : सांगली येथील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय. आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नसून सामाजिक मागासलेपणावर आहे, हे त्यांना कसं समजणार, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका केली.

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील (File Photo)

सांगली Chhagan Bhujbal On Jarange Patil : राज्यात आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली. मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडं या मागणीला ओबीसी नेत्यांसह समाजाकडूनही कडाडून विरोध केला जातोय. अशातच ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना इशारा दिलाय.

प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ (ETV BHARAT Reporter)

ओबीसींच्या अंगावर येणाऱ्यांना सोडू नका : "सगळाच मराठा समाज वाईट नाही, पण जो-जो ओबीसी समाजावर उठेल त्याला अजिबात सोडायचं नाही," असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलंय. "ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे सगळेचं सांगत असतील तर आम्हालाच टार्गेट का?" असा सवाल त्यांनी केलाय. "आरक्षणासाठी गोरगरीब जनतेची डोकी फुटत असतील तर आपण शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना देखील भेटायला जाणार. तसेच सगळ्याच पक्षांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी," अशी मागणी भुजबळ यांनी केली.

मेळाव्यातून जरांगेंवर साधला निशाणा : सांगलीमध्ये रविवारी ओबीसी समाजाच्यावतीनं महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके, इकबाल अन्सारी, शब्बीर अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला. शहरातील तरुण भारत स्टेडियममध्ये पार पडलेल्या या मेळाव्याला ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्र वाचवला पाहिजे : पुढे भुजबळ म्हणाले की, "छत्रपतींच्या महाराष्ट्रात अठरा पगड जाती एकत्र होत्या. पण महाराष्ट्रात आता वेगळंच चाललं आहे. छत्रपती नाव घेता आणि हल्ले करता. मला शिव्या देत होतात. पण बीडमध्ये आमदारांची घरं जाळली. तुम्हाला घर-दार जाळण्याचा काय अधिकार आहे? त्यामुळं महाराष्ट्र वाचवला पाहिजे, नाही तर महाराष्ट्र लुळा- पांगळा होऊन जाईल." "तुम्हाला आरक्षण पाहिजे ते कायद्याने जे काही असेल ते घ्या. पण सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार का नाही? मात्र, मराठा समाजाला आम्ही वेगळे आरक्षण द्यायला विरोध केला नाही. पण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही," असं म्हणत भुजबळांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला डिवचलं आहे.

हेही वाचा -

  1. भुजबळांचं तलवारी घासून ठेवण्याचं आवाहन, तर आम्हीही शांत बसणार नाही असा जरांगेंचा इशारा - Manoj Jarange Patil PC
  2. गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव- मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil
  3. "ओबीसीचे अ, ब, क, ड असे गट पाडले तर मराठा समाजालाही फायदा..." चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान - Chandrakant Patil On Reservation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.