ETV Bharat / politics

Bawankule On Padmakar Valvi : काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपा प्रवेश; काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार - चंद्रशेखर बावनकुळे - Padmakar Valvi Joins BJP

Padmakar Valvi Joins BJP : एकीकडं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Naya Yatra) नंदुरबारमध्ये दाखल झाली. तर दुसरीकडं नंदुरबारमध्ये काॅंग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केलाय.

Padmakar Valvi Joins BJP
माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजप प्रवेश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 7:42 PM IST

मुंबई Padmakar Valvi Joins BJP : ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर काँग्रेस पक्षाला (congress) राज्यात एकामागे एक झटके बसत आहेत. नंदुरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज (बुधवारी) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), भाजपामध्ये आताच प्रवेश केलेले अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

म्हणून केला भाजपामध्ये प्रवेश : मोदींच्या विकास कामावर प्रभावित होऊन आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचं पद्माकर वळवी यांनी सांगितलंय. तर राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा (Bharat Jodo Naya Yatra) मुंबईतील समारोप होईपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार असल्याचं सूचक भाष्य, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी केलंय.

पद्माकर वळवी यांचा योग्य सन्मान राखला जाईल : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय आहे. याप्रसंगी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पक्षानं आदिवासी समाज आणि मागासवर्गीयांची नेहमीच फसवणूक केलीय. या समाजातील नेत्यांना ही फसवणूक लक्षात आल्यानं आता हे नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी पद्माकर वळवी यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी : वळवी यांचा अनुभव आणि ज्येष्ठता लक्षात घेऊन संघटनेत त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असंही बावनकुळे म्हणाले. तसंच राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' ही नंदुरबारमध्ये असताना पद्माकर वळवी यांच्यासारखा ज्येष्ठ निष्ठावंत नेता, माजी मंत्री काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहे. यावरून काँग्रेस पक्षाची दारुण अवस्था झाली असल्याचं लक्षात येतंय. त्याचप्रमाणं राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा समारोप होईपर्यंत राज्यातील अनेक काँग्रेस नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, असंही बावनकुळे म्हणाले.

मोदींच्या विकास कामानं प्रभावित : भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना पद्माकर वळवी म्हणाले की, काँग्रेसमध्ये मी सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती. नंतर मी सभापती, आमदार, मंत्री झालो. परंतु आता भाजपा ज्या गतीनं काम करत आहे. मोदी यांच्या विकासकामानं मी प्रभावित झालो आहे. विकासाची जी धोरणं भाजपाने आखली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचत आहेत. काँग्रेसच्या काळातही आदिवासींसाठी कामं केली जात होती. परंतु आता विकास झपाट्यानं होत आहे. मी आणि काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते मागील एक वर्षापासून पक्षामध्ये नाराज होतो.

विधानसभेसाठी जर जागा दिली तर नक्कीच लढेन : काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे. काँग्रेस पक्षामध्ये समन्वय नाही आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा मी काम केलं आहे. भाजपा पक्षानं कुठलीही जबाबदारी दिली तरी ती पार पाडायला तयार आहे. आता लोकसभेसाठी संधी नाही. परंतु पुढे विधानसभेसाठी जर जागा दिली तर नक्कीच लढेन, असंही वळवी म्हणाले. पद्माकर वळवी हे १९९९ ते २०१४ या कालावधीत तळोदा आणि शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. २००९ ते २०१४ या काळात पद्माकर वळवी हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला
  2. Nashik Loksabha Constituency: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेना, खासदार श्रीकांत शिंदेंकडून थेट 'या' खासदाराची उमेदवारी जाहीर
  3. Rahul Gandhi Speech : "पंतप्रधानांनी 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज...", राहुल गांधींचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.