ETV Bharat / politics

"तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण महाराष्ट्रात", चंद्रकांत पाटलांची टोलेबोजी - तुतारीवाला माणूस

Chandrakant Patil News : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 'तुतारीवाला माणूस' हे नवं चिन्ह दिलंय. शरद पवार गटानं या चिन्हाचं अनावरण रायगड किल्ल्यावर केलं. यासंदर्भात बोलताना भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'तुताऱ्या वाजवा, नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू' असं दिसत असल्याचं म्हटलं आहे. ते सोलापूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.

Chandrakant Patil claims bjp will get more than 45 lok sabha seats in maharashtra
"तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण महाराष्ट्रात...", चंद्रकांत पाटलांची शाब्दिक टोलेबोजी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 5:38 PM IST

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे

सोलापूर Chandrakant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्ष चिन्ह दिलं. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. त्यानंतर आता शरद पवार गटाला 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगानं बहाल केलंय. या नवीन चिन्हाचं अनावरण रायगड किल्ल्यावर करण्यात आलं. मात्र, या चिन्हावरुन सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत असल्याचं पहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवार गट आणि ठाकरे गटावर जोरदार टोलेबाजी केली आहे. तसंच "तुताऱ्या वाजवा, नाहीतर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू," असा दावा त्यांनी केलाय.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू", असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. तसंच "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यांनी देशात लाभार्थी नावाचा गट निर्माण केलाय. याचं यश काही दिवसांपूर्वी झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकीत दिसून आलं," असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणावरही दिली प्रतिक्रिया : राज्यातील शिंदे सरकारनं मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. या विधेयकामुळं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, असं असलं, तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. याविषयी विचारण्यात आलं असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मराठा समाज जी मागणी करतोय, त्यासाठी आम्ही कुठं नाही म्हटलंय का? मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र नसणाऱ्यांना आम्ही आरक्षण देणार नाही, असं म्हटलोय का? तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे," असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. 'महाराष्ट्र आता नव्या क्रांतीसाठी तयार झाला'; 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पाटलांचा हल्लाबोल
  2. डोलीतून रायगडावर पोहोचले शरद पवार; स्वतः 'तुतारी' वाजवत नव्या चिन्हाचं अनावरण
  3. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या चिन्हाचं ब्रँडिंग, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.