ETV Bharat / politics

जनविश्वास रॅलीत पंतप्रधान मोदींविरोधात 'ते' वक्तव्य लालूंना भोवणार? भाजपा युवा मोर्चाकडून गुन्हा नोंदवण्याची मागणी - भाजपा युवा मोर्चा

Complaint Against Lalu Tejashwi : भाजप युवा मोर्चाने लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केलीय. पाटणाच्या गांधी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या एका वक्तव्याविरोधात गांधी मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

जनविश्वास रॅलीत पंतप्रधान मोदींविरोधात 'ते' वक्तव्य लालूंना भोवणार? भाजपा युवा मोर्चाकडून गुन्हा नोंदवण्याची मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 9:42 AM IST

पाटणा Complaint Against Lalu Tejashwi : लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी बिहारची राजधानी पाटणा गांधी मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेश प्रवक्ते कृष्ण सिंह उर्फ ​​कल्लू यांनी लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप केलाय. लालूप्रसाद यादव यांच्या या वक्तव्यामुळं देशातील 135 कोटी जनता दुखावली असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याविरोधात गुन्हा : लालूप्रसाद यादव यांच्यासह तेजस्वी यादव यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आलीय. तेजस्वी यादव यांनी विशिष्ट समाजातील लोकांविरोधात अशोभनीय टीका केल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणात गांधी मैदान पोलीस ठाण्यानं तक्रारदाराची तक्रार स्वीकारली आहे. गांधी मैदान पोलीस स्टेशनच्या सीताराम कुमार यांनी सांगितलं की, "पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा तपास सुरु आहे."

पंतप्रधान मोदींवरील टीका अशोभनीय : रविवारी पाटण्यात झालेल्या जनविश्वास रॅलीत लालू यादव यांनी मोदींना हिंदू म्हटलं नाही आणि त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर तेराव्याचा विधीही केला नाही. त्यामुळं लालू यादव यांनी नरेंद्र मोदींना हिंदू मूल्यांच्या विरोधात म्हटलंय. लालू यादव यांच्या या वक्तव्याच्या आधारे युवा मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते कृष्ण सिंह कल्लूच्या तक्रारीवरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

"आरजेडीच्या जनविश्वास रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अशोभनीय वक्तव्य करणं, जसं की नरेंद्र मोदी हिंदू नसणे, मोदीजींनी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर केस काढणे किंवा दाढी न करणे, या अशोभनीय टीका आहेत. राम मंदिराच्या स्थापनेवर भाष्य करुन लालू यादव यांनी देशातील 135 कोटी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.'' - कृष्णसिंह कल्लू, प्रदेश प्रवक्ते, भाजप युवा मोर्चा.

हेही वाचा :

  1. आम्ही भाजपाला हटवणार! राहुल गांधींचा निर्धार; भाजपा देशात द्वेश पसरवत असल्याचा आरोप
  2. पंतप्रधान मोदींवर विश्वास म्हणजे विश्वासघाताची हमी-राहुल गांधी
  3. राहुल गांधी यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्रकरण, नाशिकमधून एक माथेफिरू ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.