ETV Bharat / politics

भाजपा खासदार अनंतकुमार हेगडेंच्या 'त्या' विधानावरून कर्नाटकात रणकंदन - BJP MP Ananthkumar Hegde Remarks

BJP MP Ananthkumar Hegde : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा खासदार हेगडे यांच्या घटनादुरुस्तीवर केलेल्या वक्तव्यावरुन भाजपवर हल्लाबोल केलाय. हा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भाजपा खासदार अनंतकुमार हेगडेंच्या त्या विधानावरून कर्नाटकात रणकंदन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 1:24 PM IST

बंगळुरु BJP MP Ananthkumar Hegde : भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी घटनेत बदल करण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळं कर्नाटकात राजकीय वातावरण तापलंय. खासदार हेगडे यांना निवडणूक लढविण्यासाठी कायस्वरुपी अपात्र करावं, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी केलीय.

प्रसिद्धीपत्रक काढत टिका : मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या विधानावर सविस्तर प्रतिक्रिया देणारं प्रसिद्धीपत्रक जारी केलं. मनुवादी घटनेची अंमलबजावणी करण्याची भाजपाची राक्षसी कल्पना असल्याचं दिसतयं. पंतप्रधान मोदी हे हेगडेंच्या विधानाशी सहमत नसतील तर त्यांनी खासदार हेगडेंना पक्षातून काढून टाकावं. जर त्यांना पक्षातून काढले नाही तर त्यांना पंतप्रधान मोदींचा पाठिंबा असल्याच्या अर्थ होतो. अनंतकुमार हेगडे यांचं घटनेवरील विधान हे वैयक्तिक नसून भाजपाचा छुपा अजेंडा असल्याची घणाघाती टीका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलीय. घटना सर्वांना समानतेची वागणूक देते. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे. हेगडे यापूर्वीदेखील घटनेच्या विरोधात बोलले आहेत. भाजपाच्या हायकमांडकडून अप्रत्यक्षपणं अनंतकुमार यांना समर्थन दिलं जातंय, असंही त्यांनी म्हटलंय. अनंतकुमार यांच्यासारखे खासदार हे भाजपाचा पाठिंबा असल्याशिवाय घटनेच्या विरोधात बोलू शकणार नाहीत. घटनेविरोधात बोलणं हा कायदेशीर गुन्हा आहे. लोकसभा अध्यक्षांनी त्याबाबत नोंद घेऊन कठोर कारवाई घेणं गरजेचं आहे.

भाजपानं राखलं अंतर : खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या विधानापासून भाजपानं अंतर राखणं पसंत केलं. कर्नाटक भाजपानं अनंतकुमार यांचं घटनेबाबतचं वक्तव्य हे वैयक्तिक असल्याचं म्हटलंय. त्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविणार असल्याचही कर्नाटक भाजपाच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. भाजपा प्रवक्त्यानं एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार हेगडे यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या घटनेबाबतचं वक्तव्य म्हणजे पक्षाची भूमिका नाही.

काय म्हणाले होते खासदार हेगडे? : लोकसभा आणि राज्यसभेत भाजपाला दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर 20 हून अधिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता मिळविणं आवश्यक आहे. तरच घटनेत बदल करुन काँग्रेसनं घटनेत केलेले बदल करणं शक्य होणार असल्याचं खासदार हेगडे यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा :

  1. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप! भाजपाकडून काँग्रेस आमदारांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.