कोल्हापुर Samarjeet Ghatge Joined NCP SP Sharad Pawar : कोल्हापुरातील राजकारणाचे विद्यापीठ अशी ओळख असलेल्या समरजीतसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळं येत्या कागल विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे यांच्यात आता लढत होणार आहे.
जनताच त्यांना धडा शिकवेल : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "केंद्रातील सत्तेच्या अडून आमच्या काही जुन्या सहकाऱ्यांच्या चौकशा लागल्या. या चौकशा सुरू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील माता भगिनींनी हे थांबवा अन्यथा आम्हाला गोळ्या घाला, अशी भूमिका घेतली. मात्र, कुटुंबप्रमुखांनी चौकशीला सामोरं न जाता लाचारासारखं त्यांच्यासोबत गेले. हा कागलचा इतिहास नाही. कागलची जनता लाचारी कधीच खपवून घेणार नाही, येत्या निवडणुकीत त्यांना जनताच धडा शिकवेल, असा हल्लाबोल शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला.
माझ्यासाठी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा : "पक्षप्रवेशाची सभा ज्या गैबी चौकात झाली त्याच चौकात विधानसभेची शेवटची सभा घेतली जाईल, असं समरजीत घाटगेंनी यावेळी बोलताना सांगितलं. समरजीत घाटगे म्हणाले की, "येत्या विधानसभा निवडणुकीतील शेवटची सभा गैबी चौकातच होईल. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच उपस्थिती रहावं, कारण गेल्या वेळी याच गैबी चौकातून माझा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला होता. आता ती चूक दुरुस्त करून आमच्यासाठी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करावा," अशी मागणीही समरजीत घाटगे यांनी जाहीर सभेत केली.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया : धर्मांच राजकारण करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्यांना जनता धडा शिकवेल. राज्यात लोक परिवर्तनाच्या बाजूनं निकाल देणार. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 48 पैकी 31 ठिकाणी भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करून जनतेनं आपला रोष व्यक्त केला. आता येत्या विधानसभेतही स्वाभिमानी जनता हाच रोष व्यक्त करण्यासाठी तयार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
"सगळं करा पण साहेबांना घेऊ नका, असं त्यांना आपण वारंवार सांगायचो. पण सरकारमध्ये गेलो म्हणजे आपण सरकारी झालो अशा अविर्भावात ते भाबडेपणाने गेले." असा टोला जयंत पाटील मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता लगावला.
हेही वाचा
- भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून शिवरायांच्या पुतळ्याची मुंबईत विटंबना-संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut today news
- जागावाटपाबाबत अजित पवारांचा डाव, शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर होणार का कमी? - Mahayuti Seat Sharing
- "यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांना शरद पवारांचा..."समरजीत घाटगे थेट बोलले! - Samarjit ghatage special interview