मुंबई Chitra Wagh on Sushma Andhare : भारतीय जनता पक्षानं त्यांच्या प्रवक्त्यांची यादी घोषित केली असून त्यात प्रसिद्ध विधिज्ञ उज्वल निकम यांच्या नावाचा समावेश केला आहे. यावर शिवसेना (उबाठा गटा) नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. अंधारेंच्या टीकेला भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.
तर तुमचं पोट का दुखतंय? : यापूर्वी केंद्रात यूपीएचं सरकार असताना कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हे सरकारची बाजू मांडायचे आणि पक्षाचीही बाजू मांडत होते. आता उज्ज्वल निकम यांनी भाजपाची बाजू मांडली तर तुमचं पोट का दुखतंय? असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. अर्धवट ज्ञानींचा शिल्लकसेनेत महापूर आल्याचं दिसतंय, रोज सकाळी सर्वज्ञानी बांग देतात अन् बाकीचे सटरफटर इतरांचे उकीरडे उकरण्याचं काम करतात, अशा लोकांनी उगाच खोटं पसरवण्यापूर्वी थोडी माहिती घ्यावी नंतरच थोबाड उचकटावं, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केलीय.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे? : भाजपानं त्यांच्या प्रवक्त्यांची व नेत्यांची यादी घोषित केल्यानंतर त्यातून काही नावं वगळण्यात आली. त्यावर सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत, कदाचित नितेश निलेश राणे, चित्रा वाघ, राणा ही मंडळी कर्ण कर्कश ओरडतात. मात्र, यांचे प्रभावक्षेत्र अगदीच क्षीण झाले. याची खात्री भाजपाला सुद्धा पटली आहे. म्हणून आता सामाजिक स्वास्थ बिघडवण्याची जबाबदारी इतर लोकांना दिली गेली आहे. यात सरकारी वकील निकम सुद्धा अधिकृतरित्या आहेत, असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा :