ETV Bharat / politics

व्होटबँक म्हणून वापर करण्याऐवजी काँग्रेसनं अमरावतीत मुस्लिम उमेदवार द्यावा; भाजपाची मागणी - Amravati Assembly Constituency - AMRAVATI ASSEMBLY CONSTITUENCY

Amravati Assembly Constituency : अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे निवडून आले. त्यानंतर भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी या संदर्भात काँग्रेसनं अमरावतीमध्ये 'मोहब्बत की दुकान सिद्ध करावं' असं म्हटलंय. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या...

Amravati Assembly Constituency
भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी-फाईल फोटो (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 6:58 PM IST

अमरावती Amravati Assembly Constituency : भाजपा मुस्लिम विरोधी आहे, म्हणून काँग्रेस सतत बोंबा मारत आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला अमरावती विधानसभा मतदारसंघात 64 हजार मुस्लिमांची मते मिळाली. मुस्लिमांच्या ताकदीवर काँग्रेसचा विजय झाला असून आता विधानसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघात व्होटबँक म्हणून ज्या मुस्लिम समाजाचा उपयोग करून घेतला. आता या मुस्लिम समाजातील व्यक्तीला अमरावती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीनं करण्यात आलीय. या संदर्भात भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसनं आता अमरावतीमध्ये 'मोहब्बत की दुकान सिद्ध करावं' असं म्हटलंय.

प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी (ETV BHARAT Reporter)

देशात काँग्रेसच्या यशामागे मुस्लिमांचे श्रेय : लोकसभा निवडणुकीत देशात सलग तिसऱ्यांदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा दारुण पराभव झाला, असं असताना काँग्रेस आपणच विजयी झाल्याच्या अविर्भावात वावरत आहे. देशात काँग्रेसच्या ज्या काही थोड्याफार जागा वाढल्या आहे किंवा देशभर जी काही मतांची टक्केवारी वाढली आहे त्याचं संपूर्ण श्रेय मुस्लिम समाजाला जातं अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे खरे श्रेय हे मुस्लिम मतदारांचे आहे. त्यातही अमरावती विधानसभा मतदारसंघात मिळालेली आघाडी अतिशय निर्णायक असून अमरावतीत काँग्रेसला मिळालेल्या विक्रमी आणि निर्णायक आघाडीचे संपूर्ण श्रेय हे मुस्लिमांचं असल्याचं देखील शिवराय कुलकर्णी यांनी सांगितलं.

काँग्रेसपेक्षा मुस्लिमांचे योगदान मोठे : लोकसभा निवडणुकीत आपल्याला मते मिळावी यासाठी काँग्रेसनं पाठवलेले पैसे परत करून, मुस्लिम समाजाने चंदाजमा करून काँग्रेसच्या उमेदवाराला स्वतः बळ दिले. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांपेक्षा मुस्लिम समाजाचे योगदान फार मोठे आहे, असं शिवराय कुलकर्णी यांनी म्हटलंय.

मुस्लिम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर : भाजपा मुस्लिम विरोधी आहे असा चुकीचा समज पसरवून मुस्लिमांची गठ्ठा मतं मिळवून अमरावती जिल्ह्यात काँग्रेस नेते स्वतःची पोळी शेकून घेत आहेत. खासदार बळवंत वानखडे विजयी झाल्यावर त्यांच्या विजयाचे श्रेय मुस्लिम समाजाला न देता काँग्रेस नेते स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. भाजपाला मुस्लिम विरोधी ठरवणाऱ्या काँग्रेसनं आजवर कधीही अमरावती विधानसभेची उमेदवारी मुस्लिमांना दिलेली नाही. त्यांचा केवळ गठ्ठा मतदानासाठी व्होटबँक म्हणून वापर करून घेतला. मुस्लिमांच्या मतांवर विजय मिळवायचा आणि निवडणुकीत आपल्या नेत्यांची दुकानदारी चालवायची अशी काँग्रेसची मानसिकता आहे असा आरोप, शिवराय कुलकर्णी यांनी केलाय.

तर भाजपा देणार मुस्लिमांना उमेदवारी : मुस्लिम समाजातील एखादा सशक्त आणि प्रामाणिक व्यक्ती ज्याच्यामागे त्याचा समाज ताकदीनं उभा असेल अशी मुस्लिम व्यक्ती भाजपाकडं आली आणि त्यांनी आम्हाला उमेदवारी मागितली तर आम्ही निश्चितच त्यांना उमेदवारी देऊ. तसेच पूर्ण ताकदीनिशी प्रामाणिकपणे त्यांच्या विजयासाठी मैदानात उतरू, असं देखील शिवराय कुलकर्णी यांनी स्पष्ट केलय.

हेही वाचा -

  1. वंचितनं मुस्लिम उमेदवार दिला कारण..प्रकाश आंबेडकरांचा एआयएमआयएम थेट आरोप - Prakash Ambedkar
  2. असुद्दीन ओवेसींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं दिला 'हा' मुस्लिम उमेदवार, भाजपाच्या माधवी लतांना फायदा होणार? - Lok Sabha Election 2024
  3. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद; 21 उमेदवार रिंगणात... - Nashik Teacher constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.