हैदराबाद Mimi Chakraborty resigns from MP : तृणमूल काँग्रेस (TMC) अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोठा झटका बसलाय. ममता यांच्या पक्षाच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी गुरुवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. अभिनेत्रीनं आज पक्षाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. एकीकडं निवडणूक आयोग लवकरच देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे, अशा वेळी मिमीनं पक्ष सोडलाय. मिमी चक्रवर्ती पश्चिम बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
अद्याप राजीनामा स्विकारलेला नाही : मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मिमी चक्रवर्ती यांनी आज खासदारपदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुपूर्द केलाय. याबाबत माध्यमांशी बोलताना मिमी चक्रवर्ती यांनी टीएमसीमधून राजीनामा दिल्यावर सांगितलं की, "मी निश्चितपणे राजीनामा दिलाय. पण माझा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोलले आहे. त्या योग्य निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलंय."
राजकारण माझ्यासाठी नाही : तसंच पुढं बोलताना त्या म्हणाल्या, "राजकारण हे माझ्यासाठी नाही. तुम्ही जर कोणाला मदत करत असाल तर तुम्हाला राजकारणात कोणाचा तरी प्रचार करावा लागेल. राजकारणी असण्यासोबतच मी अभिनेत्री म्हणूनही काम करते. तुम्ही राजकारणात असाल तर, तुम्ही काम करा किंवा करु नका, अशी टीका होईल."
भाजपात प्रवेश करणार का : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यावर मिमी म्हणाल्या, "मी ममता बॅनर्जींशी माझ्या मुद्द्यांवर बोलले. ज्या पक्षानं मला पुढं जाण्याची संधी दिली, त्या पक्षाचा राजीनामा दिल्याबद्दल मला त्यांना सांगायचं होतं. मी त्यांना 2022 मध्ये खासदारकीचा राजीनामा दिल्याचंही सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी राजीनामा फेटाळला होता." तृणमूल काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मिमी तृणमूल काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का, याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
- जादवपूर मतदारसंघातून खासदार : मिमी चक्रवर्ती पश्चिम बंगालच्या जादवपूर मतदारसंघातून खासदार होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिमी चक्रवर्ती जादवपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप मिमी चक्रवर्तींचा राजीनामा स्वीकारलेला नाही.
हेही वाचा :