ETV Bharat / politics

"सचिन तेंडुलकरच्या गेमिंग जाहिरातीमुळंच बॉडीगार्डचा मृत्यू", बच्चू कडू आक्रमक; दिला 'हा' इशारा - Bacchu Kadu Vs Sachin Tendulkar

Bacchu Kadu News : काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केली होती. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून ही आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत होतं. याच प्रकरणावरुन आता आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळतंय.

Bacchu Kadu aggresive against cricketer Sachin Tendulkar online gaming add after bodyguard death
सचिन तेंडुलकर आणि बच्चू कडू (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 1:35 PM IST

बच्चू कडू यांचा सचिन तेंडुलकर यांना इशारा (reporter)

अमरावती Bacchu Kadu News : भारतरत्न असणाऱ्या सचिन तेंडुलकरनं ऑनलाईन गेमिंगची जाहिरात थांबवावी यासाठी आम्ही यापूर्वी देखील इशारा दिला होता. आता त्याच्याच रक्षणासाठी तैनात असणारा अंगरक्षक ऑनलाईन गेमिंगमुळं आत्महत्या करतो ही दुर्दैवी बाब आहे. सचिन तेंडुलकरनं त्वरित ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सोडावी अन्यथा भारतरत्न परत करावा अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात 6 जून पर्यंत सचिन तेंडुलकरनी योग्य निर्णय घ्यावा अन्यथा त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रहार पक्षाचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिलाय.

घरासमोर जाळणार पुतळा : सचिन तेंडुलकर यांची ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणे हे कृत्य भारतरत्न या पुरस्काराला शोभणारं नाही. सचिन तेंडुलकरनं भारतरत्न पुरस्कार परत करावा अन्यथा ऑनलाइन गेमिंग च्या जाहिराती करणं सोडलं नाही तर सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करू, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.

मूळ मुद्द्यापासून भरकटली निवडणूक : पुढं ते म्हणाले की, "ही लोकसभा निवडणूक जातीपाती आणि धर्माच्या राजकारणावर लढवली गेलीय. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये सर्वसामान्य लोकांना साधं झोपायला देखील घर मिळत नाही. मुंबई सहा ते सात लाख लोक आजही फुटपाथवर झोपतात, आणि मुंबईत सहा हजार हेक्टर जमीन फक्त सहा कुटुंबाकडं आहे. असे मुद्दे खरंतर निवडणुकीदरम्यान यायला हवे होते. मात्र, दुर्दैवानं ते कुठेच दिसले नाही", याबाबत खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली. तसंच इंग्रजांकडून गोदरेजला तीन हजार एकर जमीन मिळाली. ही जमीन गोदरेजनं सरकार दरबारी जमा करावी यासाठी आमचं हे आंदोलन राहणार असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; डोक्यात गोळी झाडून संपवलं जीवन - SRPF Soldier Commits Suicide
  2. खऱ्या भाजपावाल्यांनी फक्त सतरंज्याच टाकायच्या का? बच्चू कडूंचा सवाल; बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू संतापले - LOK SABHA ELECTION 2024
  3. अमरावतीत आज राजकीय दंगल; अमित शाह यांची सभा, बच्चू कडू यांची मिरवणूक - Ravi Rana Vs Bacchu Kadu

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.