ETV Bharat / politics

निवडणूक निकालानंतर आशिष शेलार 'त्या' विधानावरून 'क्लिन बोल्ड', महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली फिरकी - Ashish Shelar news

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 7:56 AM IST

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार धक्का दिला. एक्झिट पोलचेदेखील अंदाज खोटे ठरले आहेत. य निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांचे राजकीय संन्यासाचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

ashish shelar news
ashish shelar news (Source- ETV Bharat Reporter)

मुंबई- महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा करणारे भाजपाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. तुम्ही आता कधी राजकीय सन्यांस घेणार, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते आशिष शेलारांची खिल्ली उडवित आहेत.

महायुतीच्या 2019 च्या तुलनेत 24 जागा कमी झाल्या आहेत. महायुतीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 17 जागांवर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीच्या 24 जागात वाढ झाली आहे. महाविकास आघाडीला 31 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाकडून आशिष शेलार तुम्ही कधी संन्यास कधी घेणार आहात, असा प्रश्न विचारला जात आहे. आशिष शेलार हे महाविकास आघाडीवर विशेषत: शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत होते. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते सोशल मीडियावर आशिष शेलार यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

  • काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटले, " आशिष शेलारजी शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडल्यावर दुःख नक्कीच होईल. पुढील वाटचालीसाठी आगाऊ शुभेच्छा."
  • अभिनेता किरण माने यांनीदेखील भाजपा नेता शेलार यांना राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले, "खरा मर्द दिलेला शब्द पाळतो. आशिषजी तुम्ही तो पाळणार याची खात्री आहे !"
  • शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांच्या राजकीय संन्यासाची तयारी करून दिल्याचं सांगितलं. त्यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, "आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना... म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी , लोटी , सगळं देता येईल.. !
  • सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी आशिष शेलार यांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत राजकारण कधी सोडत आहात, असा प्रश्न विचारला आहे.

काय आहे राज्यातील परिस्थिती- महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 2019 च्या तुलनेत एनडीएच्या (राज्यातील महायुती) जागा निम्म्याहून कमी झाल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांकडून राज्यात 48 पैकी 45 जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं होतं. प्रत्यक्षात राज्यात महायुतीला केवळ 17 जागावर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीला 31 जागावर विजय मिळाला आहे. सांगलीतील अपक्ष उमदेवार विशाल पाटील हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या एकूण 32 जागा असणार आहेत.

निवडणुकीत जनतेचा जनादेश स्वीकारावा लागतो- पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरण्यासाठी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करण्याकरिता एनडीएचीदेखील दिल्लीत बैठक होणार आहे. निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली. "निवडणुकीनंतर भाजपा राज्यघटना बदलेल, या विरोधकांच्या प्रचारामुळे राज्यात एनडीएची चांगली कामगिरी झाली नाही. निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा आहे तसा स्वीकारावा लागतो. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करून पुढच्या विधानसभा निवडणुकीत नुकसान भरून काढू," अशी फडणवीस यांनी एक्स मीडियावर पोस्ट केली.

हेही वाचा-

  1. लोकसभा निवडणूक निकाल 2024 :सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया - lok Sabha Elections Result 2024
  2. राज्यात महाविकास आघाडीमुळं महायुतीचं टेन्शन वाढलं; तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट - maharashtra lok sabha 2024 winner list
  3. महाराष्ट्रात धक्कादायक निकाल; 'या' उमेदवारांना दाखवला घरचा रस्ता, निकालाचं विश्लेषण वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election 2024 Results

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.