ETV Bharat / politics

भाजपाला हटवण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा - असदुद्दीन ओवैसी - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 10:02 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचाराकरीता एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. शहरात येताच असदुद्दीन ओवैसी यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवैसी
सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024 : अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी वैजापूर येथे झालेल्या जाहीर सभेत केली. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत आहोत, तेथील मतदारांनी त्यांना मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. तर दुसरीकडं जाहीर सभेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात जोरदार टीका करत असताना, वंचित आघाडीच्या विरोधात मात्र, एकही शब्द त्यांनी काढला नाही. त्यामुळं आगामी काळात वेगळं समीकरण तर जुळणार नाही ना? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.

इलेक्ट्रॉल बॉण्ड माध्यमातून भाजपाला मिळाले पैसे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आता मासबंदीचा उच्चार सुरू झाला आहे. उपवासाच्या काळात मास खाऊ नका असं ते म्हणतात, तर मी 30 दिवस रोजा पकडतो त्या काळात तुम्हीही जेवण करू नका, असं मी म्हणलं तर चालेल का? असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केलाय. इलेक्ट्रॉल बॉण्ड माध्यमातून सहा हजार कोटी रुपये भाजपाला मिळाले. तर इतर पक्ष देखील कुठे मागे नाहीत. मात्र मांस विकणाऱ्या कंपन्यांनी दिलेले पैसे इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून कसे चालतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. एकीकडं मास विकणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचं आणि दुसरीकडं मास विक्रीचे दुकानं बंद ठेवायचं असं सांगत गरीबाच्या पोटावर पाय मारायचं काम मोदी करतात. तर सर्व पक्षांना इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून पैसे मिळाले. मात्र, आम्हाला या बॉण्डची गरज नाही, आम्ही तर जेम्स बॉण्ड आहोत अशी मिश्किल टीका त्यांनी राजकीय पक्षांवर केलीय. आमचा जनतेसोबतचा बॉण्ड खूप चांगला आहे. त्यामुळं आम्हाला पुन्हा यश मिळेल असा विश्वास देखील ओवैसी यांनी व्यक्त केला.

शिवसेना कायदे तयार करताना भाजपासोबत होती : देशात जेव्हा वेगवेगळे कायदे केले गेले, त्यावेळी शिवसेना भाजपासोबत होती. त्यामुळं त्यांचा खरा चेहरा ओळखा असा आरोप ओवैसी यांनी जाहीर सभेत केला. देशात एन.आर.सी, सीएए, ट्रिपल तलाक, राम मंदिर हे कायदे होत असताना, शिवसेनेने मोदीला पाठिंबा दिला. त्यामुळं राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक काँग्रेस आणि एक भाजपा यांच्या विरोधात आपली ही लढाई असल्याचं ओबीसी यांनी जाहीर सभेत सांगितलं. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी मागील पाच वर्षात काम करताना, येणारा माणूस कुठल्या समाजाचा किंवा जातीचा आहे हे न पाहता काम केलं. त्यामुळं जनता पुन्हा एकदा त्यांना संधी देईल असा विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला.

आता खान बाण कस बोलणार : 2019 च्या आधी वीस वर्ष असलेले खासदार खान की बाण असं बोलत होते. मात्र, आता त्यांचा बाण कुठे गेला असा टोला ओवैसी यांनी लगावला. ज्यावेळेस एखादा माणूस विनाकारण अनावश्यक बडबड करतो, त्यावेळी त्याच्याच गळ्यात तो साप पडतो, अशी अवस्था शिवसेनेची झालीय. आता मशाल त्यांना घ्यावी लागली अशी मिस्कील टीका, ओवैसी यांनी ठाकरे गटावर केलीय.

हेही वाचा -

  1. महायुतीचे शक्ती प्रदर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024
  2. संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut
  3. नटसम्राट खासदार पाहिजे की कार्यसम्राट, अजित पवारांचा सवाल; अमोल कोल्हेंसह सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर - Ajit Pawar vs Amol Kolhe

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.